महिला PCS अधिकाऱ्याची आत्महत्या : भाजप नेत्यांसह 6 जणांवर FIR दाखल, सोबतच आला पोस्टमोर्टम रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बलिया जिल्ह्यातील नगर पंचायत मनियर येथील ईओ मणी मंजरी राय यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम अहवालात फाशीची घटना उघडकीस आली आहे. याच्या आधारे पोलिस प्रथम आत्महत्येचा विचार करत आहेत. पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबीयांनी महावीर घाटावर ईओचे अंत्यसंस्कार केले.

या अगोदरच्या प्रकरणात त्यांचा भाऊ विजयानंद रायने बुधवारी मनियर नगर पंचायत अध्यक्ष, सिकंदरपूर ईओ, टॅक्स लिपिक, संगणक ऑपरेटर, कंत्राटदार आणि चालक यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. यात आरोप आहे की, निविदा काढल्याशिवाय चेअरमनने बनावट मार्गाने ३५ कामांची कागदपत्रे बनवून हे काम करण्यासाठी आदेश देण्याचा दबाव ईओवर आणला होता. त्यापैकी १८ कामे एकाच कंत्राटदाराला देण्यात आली. ईओने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. या लोकांच्या सतत दबावामुळे व अत्याचारामुळे त्यांनी आत्महत्या केली.

तक्रारीत म्हटले गेले आहे की, बलिया जिल्ह्यातील मनियर नगर पंचायतीत मणि मंजरी राय या कार्यकारी अधिकारी पदावर पहिले नियुक्त होत्या. त्यांच्यावर नगरपंचायत अध्यक्ष व काही कर्मचारी व कंत्राटदार बनावट कामे करण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी दबाव आणत होते. याला ईओने विरोध केला होता.

दबावामुळे ईओने डीएमची भेट घेऊन तीन महिन्यांकरिता जिल्हा मुख्यालयात स्वत:ला संबद्ध केले होते. नंतर नगर पंचायतीत पदभार सांभाळल्यानंतर ईओच्या माहितीशिवाय चेअरमन भीम गुप्ता, टॅक्स लिपीक विनोद सिंह, संगणक ऑपरेटर अखिलेश यांनी त्यांची बनावट सही करून सरकारकडे पैशाची मागणी केली. सीओ सिटी एके सिंह यांनी सांगितले की, पुढील कारवाई केली जात आहे.