धक्कादायक ! प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीची विष पिऊन तर पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – साता जन्माच्या साथीच्या आणाभाका घेतलेल्या जोडप्याने ऐन दिवाळीत आत्महत्या (Suicide Of love marriage Couple) केल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुले असून ती आता कायमची पोरकी झाली आहेत.

सुभाष बोरकर आणि प्रमिला बोरकर अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणासाठी औरंगाबादहुन आपल्या गावी आलेल्या या जोडप्यात संशयामुळे वाद झाला होता. या वादामुळे या जोडप्याने थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. पती सुभाष बोरकर आपली पत्नी प्रमिलाला घेऊन कळमनुरी तालुक्यातील भुवनेश्वर इथे गेला. तिथे गेल्यावर सुभाषने विषारी औषध घेऊन जीवन संपवले तर त्याच परिसरात प्रमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आठ दिवसानंतर आढळला. ऐन दिवाळीत आईबाबांच्या आत्महत्येने दोन्ही मुल कायमची पोरकी झाली आहेत. दरम्यान, पती-पत्नीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे