मालकाने पैसे न दिल्याने हॉटेल कामगाराची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेल मालक दर महिन्याला पगारातून १०० रुपये कापून घेतलेले पैसे न दिल्याने रागाच्या भरात एका हॉटेल कामगाराने विष पिऊन आत्महत्या केली.

मारुती बाबुराव लोखंडे (वय ६७, रा़ तळदंगे, ता़ हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. मारुती लोखंडे यांने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

हॉटेल मालकाशी त्याची पगारावरुन वादावादी झाली होती. हॉटेल मालक दर महिन्याला पगारातून १०० रुपये कापून घेत होता. ही रक्कम त्याने परत मागितल्यानंतरही त्याने ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात आपण विष घेतल्याचे त्याने या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like