फायनान्स कंपनीने ट्रॅक्टरचा ‘लिलाव’ केल्याने युवक शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केला. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तरुण शेतकऱ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.

भारत बारकू गडदे (२४) हे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गडदे यांनी दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते.

गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता. मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी वाहतुकीचे काम न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाली. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही. नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या