Nashik News : वरिष्ठांकडून सतत मानसिक त्रास अन् कंपनीतील बदनामीला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –  कंपनीत होणारा मानसिक त्रास आणि वरिष्ठांच्या बदनामीला कंटाळून एका 41 वर्षीय अधिकाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नाशिक येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

मिनेश चंद्रात्रे असे आत्महत्या केलेल्या अधिका-याचे नाव आहे. जयेंद्र थोराद, गौरव वाणी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंदिरानगर परिसरात गुजरात येथील सानुश्री निधी लिमिटेड कंपनीची शाखा आहे. या शाखेत मिनेश चंद्रात्रे प्रमुख म्हणून काम पाहत होते. काम करत असताना कंपनीतील गौरव करकरे, जयेंद्र थोरात, गौरव वाणी यांनी एकत्र येत मिनेश यांच्या ताब्यातील कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. तसेच 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप करत त्यांची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून मिनेश यांनी दिंडोरी येथील वन विभागाच्या शिवारात शनिवारी (दि.9 ) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. चंद्रात्रे यांच्या वडिलांनी तिन्ही संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.