इचलकरंजीतील एकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन – इचलकरंजी येथील एका इसमाने शिरढोण-कुरुंदवाड पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.19) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. शनिवारी (दि. 20) सकाळी वजीर रेस्क्‍यू फोर्सच्या पथकातील जवानांनी मृतदेह शोधून काढला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

अशोक दत्तोबा मांगलेकर (वय 50 रा. इचलकरंजी ) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कुरुंदवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगलेकर यांनी शुक्रवारी रात्री आठच्याच्या सुमारास येथील शिरढोण कुरुंदवाड पुलावरुन पंचगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वजीर रेस्क्‍यू फोर्सच्या पथकातील जवानांनी मृतदेह शोधून काढला. कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे.