पुण्यातील पोलीस हवालदाराची रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराने रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या केली. हा प्रकार आज (रविवार) दुपारी हडपसर रेल्वे स्थानकाजवळील काळेपडळ येथे उघडकीस आला आहे.

डी.पी. गजरमल असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दि. ८ ऑगस्ट पासून गजरमल हे सिक लिव्हवर होते अशी माहीती वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांनी दिली. मिळालेल्या प्राथमीक माहितीनुसार गजरमल यांनी घरगुती कारणावरुन आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणाची नोंद पुणे लोहमार्ग पोलिसांनी केली असून घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ebc2ab6-9e17-11e8-950b-cd37fd1693f6′]

पोलीस हवालदाराने रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या केल्याने पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. गजरमल हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते अशी माहीती वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ आणि सामाजीक कार्य़कर्ते जितेंद्र जगताप यांनी देखील हडपसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या केली होती. गजरमल यांनी रेल्वेखाली उडीमारुन आत्महत्या केली की त्यांचा अपघात झाला याचा तपास पुणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.