धक्कादायक ! जमिनीच्या वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मोठ्या भावासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून धाकट्या भावाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शाहुपुरीत सोमवारी (दि.9) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. भररस्त्यामध्ये ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष जयसिंग शिंदे (वय-36 रा. शाहूपुरी, शिवाजीनगर, सातारा) असे आत्महत्या करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष आणि त्याचा मोठा भाऊ गणपत जयसिंग शिंदे (वय-46) यांच्यामध्ये मागील अनेक वर्षापासून जमिनीवरून वाद होत होते. हा वाद न्यायालयातही सुरु आहे. आज त्याची तारीख होती. दरम्यान, आज सकाळी याच वादावरून त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाले. हे वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने रागाच्याभरात स्वत:जवळ असलेल्या पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून घेतली.

भररस्त्यात हा प्रकार घडल्याने शाहूपुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. संतोष हा मुंबईत रियल इस्टेटचा व्यवसाय करत होता. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना होता की नाही, हे अद्याप समोर आले नसून पोलीस यासंदर्भात चौकशी करीत आहेत.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like