९ बँकांच्या क्रेडिट कार्डच्या जाळ्यात ‘फसलं’ अख्खं कुटूंब, संपुर्ण कुटूंबांनी छतावरून मारली उडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने ९ बँकांमधून क्रेडिट कार्ड घेऊन त्यातून पैसे खर्च केले, परंतू जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा या तरुणासह त्याच्या कुटंबाने इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या आत्महत्येत या तरुणाचा मृत्यू झाला असून त्यांची ५ वर्षाची मुलगी आणि पत्नी सध्या गंभीर जखमी असल्याने मृत्यूशी झुंज देत आहेत. ही गंभीर घटना दिल्लीत घडली.

पत्नी आणि मुलीचा वाजला जीव

पूर्व दिल्लीत जगतपूरी भागात लोन आणि क्रेडिट कार्ड वाल्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केल्यानंतर याला कंटाळून पती, पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलीला घेऊन त्यांनी आत्महत्या केली. यात सुरेश (वय ३४) चा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मंजित कौर आणि मुलगी तान्या या दोघी गंभीर जखमी आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

९ बँकांकडून घेतले होते क्रेडिट कार्ड

सुरेशने ९ बँकेतून क्रेडिट कार्ड घेतले होते. त्याने परिवाराची गरज भागवण्यासाठी क्रेडिट कार्ड खरेदी केले होते. बराच खर्च केल्यानंतर क्रेडिट कार्डच्या व्याज , पेनल्टी आणि रिकव्हरीसाठी त्यांना बँकेतून फोन येत होते. यामुळे ते तणावात होते. त्यानंतर त्याची आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रात्री उशीरा दोघा पती पत्नीने आपल्या ५ वर्षांच्या मुली सहित इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला. यात सुरेशचा जागीच मृत्यू झाला, यात त्याची पत्नी आणि मुलगी मात्र वाचले आहेत. महिलेच्या चौकशीनंतर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

म्हणून केली आत्महत्या

पोलीस तपासात उघड झाले की मृत सुरेश कुमार एका खासगी कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटरचे काम करत होता, परंतू पगार कमी आणि खर्च जास्त असल्याने त्यांने विविध बँकांचे क्रेडिट कार्ड घेतले होते. यात त्यांच्यावर तब्बल ८ कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. परंतू हे कर्ज ते फेडू शकले नाहीत. बँकेतून त्यांना पैसे परत करण्यासाठी मागणी होत होती. याला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त