लग्न जुळत नसल्याने तरुणांची आत्महत्या

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातुन तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.आकाश शिवाजीराव झोडपे वय 24 वर्ष राहणार रेणापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.

आकाशसाठी गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबीय वधू बघण्याचा प्रयत्न करत होते लग्न जुळत नसल्या कारणाने आकाशने गावा लगतच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी पाथरी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली वार्ता कानावर येताच अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती शिवाजीराव झोडपे यांनी पाथरी पोलीसात दिली.

त्यावरून पाथरी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व्ही.डी.वाघमारे हे करीत आहेत.

You might also like