खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन

फलटण तालुक्यातील होळ गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय-४०) यांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. विनोद भोसले यांनी गळफास घेऊन आत्मह्त्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठि लिहून ठेवली असून त्यामध्ये खासगी सावकाराचा फोन नंबर व रक्कमेचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे होळ गावासह साखरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी साखरवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
[amazon_link asins=’8192910962′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79e03516-a2bf-11e8-b76b-efe00fb1f0ee’]
या बाबत अधिक माहिती अशी की, होळ येथील विद्यमान उपसरपंच विनोद भोसले यांनी काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान जिंती खुंटे रोडवर जिंती (कार्पोरेशन हद्द) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तेथून जाणाऱ्या लोकांनी पहिल्या नंतर या बाबत होळ व साखरवाडी भागातील लोकांना व ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी चार ते पाच सावकारांची नावे व रक्कम, त्यांचे मोबाईल नंबर लिहल्याचे आढळून आले. भोसले यांनी चिट्ठीच्या चार झेरॉक्स काढून एक चिट्ठी शर्ट मध्ये, एक पॅन्ट मध्ये, एक मोटारसायकलच्या समोरील बाजूस व एक मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवली होती.

मी खाजगी सवकरकीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा भोसले यांनी चिठ्ठीत उल्लेख केला आहे. या चिट्ठीच्या आधारे त्या चार ते पाच खाजगी सावकारांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच  पोलिसांनी खाजगी सावकरकी बाबतीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सावकारांच्या अटकेची मागणी करत होळसह साखरवाडी परीसरातील लोकांनी पोलिस ठाण्याला घेरले होते.