जिल्ह्यातील प्रत्येक गरीबास घरकुल देण्याचा प्रयत्न : खा. विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला घरकुल देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या गृह निर्माण योजना सक्षमपणे राबवून नगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबास घरकुल देणाचा प्रयत्न राहील, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

महानगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनाचे घरकुल सोडतीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकला पिण्याचे स्वच्छ पाणी, घर आणि शौचालय देण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी गॅस आणि शौचालय संकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. आता २०२२ पर्यंत प्रत्येकला घर देण्यासाठी युद्ध पातळीवर केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अर्थ संकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून ह्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. दुग्ध शर्करा योग म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेली गृहनिर्माण खात्याची जबाबदारी त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक गरिबाला निश्चितच आपले हक्काचे घर मिळेल, असे विखे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

 

Loading...
You might also like