Pune : हडपसरमधील ‘वर्मा गँग’चा सराईत गजाआड, गावठी पिस्तुल व काडतुस जप्त

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरच्या सुजीत वर्मा गँगमधील (sujit verma gang) एका सराईत (criminal) गुन्हेगाराच्या जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) मुसक्या आवळल्या (arrested) आहेत. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय-21 रा. शांतीसागर वसाहत, आकाशवाणी समोर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे याला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात अटक करण्यात आली. या सरातईताकडून 50 हजार 300 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

मंगळवारी सायंकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, प्रमोद नवले यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी स्टेशन चौकातील मनोहर क्लॉथसमोर क निळे काळे रांगाचा टी शर्ट घातलेला व्यक्ती कमरेला पिस्तुल लावून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस सापडले. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी प्रतिक वाघमारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे 8 गुन्हे दाखल आहेत. आरोपी वाघमारे याच्यावर पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

पाच महिन्यापूर्वी भेकराईनगर हडपसर येथे खून (murder) झालेला वर्मा गाँगमधील सराईत मयत गुन्हेगार शोएब शेख हा यातील आरोपी प्रतिक वाघमारे याच्या जवळचा जोडीदार होता. त्या अनुषंगानेही स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास चालू आहे. वाघमारे याने सदरचे गावठी पिस्तुल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे का ? याचा तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

You might also like