फायद्याची गोष्ट ! मुलीला ‘करोडपती’ बनवणार्या ‘या’ स्कीममध्ये नवीन अकाऊंट उघडण्यासाठी सरकारनं दिली मोठी ‘सूट’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू साथीमुळे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धि खाते उघडणाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सुकन्या समृद्धि खाते उघडण्यासाठी पात्रतेच्या निकषात सरकारने काही प्रमाणात शिथिलता जाहीर केली आहे. पोस्ट ऑफिसच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, सुकन्या समृद्धि खाते 31 जुलै 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अशा मुलींच्या नावे उघडले जाऊ शकते, ज्या मुलींचे वय 25 मार्च 2020 ते 30 जून 2020 पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी दरम्यान 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
ही सूट लॉकडाऊनमुळे सुकन्या समृद्धि खाते न उघडू शकलेल्या मुलींच्या पालकांना मदत करेल. अन्यथा, सुकन्या समृद्धि खाती केवळ जन्माच्या तारखेपासून वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत उघडली जाऊ शकतात. सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नाचा खर्च सहजपणे पूर्ण करू शकतात. या योजनेंतर्गत मुलगी 21 वर्षे पूर्ण झाल्यावर परतावा मिळू शकेल. योजनेच्या नियमांनुसार पालकांनी लहान वयातच या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरवात केली तर ते 15 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
व्याज दर
सुकन्या समृद्धि योजनेला सध्या 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत खाते उघडताना जो व्याज दर असतो, त्याच दराने संपूर्ण गुंतवणूकीच्या कालावधीत व्याज मिळते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सरकारने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याज दरात बदल केलेला नाही.
एका वर्षात आपण किती गुंतवणूक करू शकता
आपण एका आर्थिक वर्षादरम्यान सुकन्या समृद्धि खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. त्याचबरोबर, आर्थिक वर्षात किमान ठेव रक्कम 250 रुपये आहे. याचा अर्थ असा की आपण वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करू शकता, खाते चालू ठेवण्यासाठी किमान 250 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम खातेधारकाच्या खात्यावर परत केली जाईल. 15 वर्षांपर्यंत सुकन्या समृद्धी खात्यात रुपये जमा करता येतात.
आयकरावर सूट
सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करून प्राप्तिकराच्या सूटवरही दावा केला जाऊ शकतो. या योजनेत वर्षाकाठी दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक आयकर सूट पात्र आहे. अशा प्रकारे, आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत या योजनेतील गुंतवणूकीवर पालक आयकर सूट मिळवू शकतात. विशेष म्हणजे या योजनेत व्याज उत्पन्न आणि मुदतपूर्तीची रक्कमही करमुक्त आहे.
खाते हाताळण्याचे नियम बदलले
नवीन नियमांतर्गत, 18 वर्षांच्या वयानंतर मुलगी स्वत:चे खाते चालवू शकते. पूर्वी हे वय 10 वर्षांचे होते. जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल, तेव्हा पालकांना मुलीशी संबंधित कागदपत्र पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावे लागतील.
ही कागदपत्रे दोन मुलींचे खाते उघडण्यासाठी आवश्यक असतील
आता दोनहून अधिक मुलींचे सुकन्या समृध्दी खाते उघडण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील. नव्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त मुलींचे खाते उघडायचे असल्यास जन्म प्रमाणपत्रासह प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असेल. यापूर्वी पालकांनी केवळ मुलीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक होते.