मुलीचं भविष्य करा सुरक्षित ! 21 वर्षानंतर मिळतील 64 लाख रूपये ‘रिटर्न’, फक्त 250 रूपयांनी उघडा अकाऊंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारची सुकन्या समृद्धि योजना सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला जर आपल्या मुलीच्या भविष्यासह चांगले रिटर्न मिळवण्याची इच्छा असेल तर सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय) हा एक चांगला पर्याय असू शकतो. केंद्र सरकारच्या या योजनेत लाभार्थ्यांना तीनपटपेक्षा जास्त पैसे परत मिळू शकतात. एवढेच नव्हे तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला करात सूट देखील मिळते. योजनेंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या मुलीच्या नावे खाते उघडू शकते, एखादी व्यक्ती केवळ दोन मुलींचे खाते उघडू शकते आणि त्यापेक्षा अधिक खाती उघडण्यासाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. या योजनेंतर्गत दहा वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावे खाते उघडले जाऊ शकते.

जर या खात्यात एक वित्तीय वर्ष दरम्यान कमीतकमी रक्कम जमा केली गेली नाही तर 15 वर्षांच्या कालावधीत ही कधीही नियमित केली जाऊ शकते. यासाठी दरवर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल.

सुकन्या समृद्धि खाते योजना 2020 जमा – आर्थिक वर्षात कोणत्याही एका खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. त्याचबरोबर, आर्थिक वर्षात किमान ठेव रक्कम 250 रुपये आहे. याचा अर्थ असा की, आपण एका आर्थिक खात्यात दीड लाख रुपयांपर्यंत आणि एका खात्यात किमान 250 रुपये गुंतवणूक करू शकता. जर एखाद्या व्यक्तीने चुकून या खात्यात दीड लाखाहून अधिक रुपये जमा केले तर ही रक्कम व्याजात मोजली जाणार नाही. तसेच ही रक्कम ठेवीदारांच्या खात्यावर परत केली जाईल. हे खाते 15 वर्षांपर्यंत जमा केले जाऊ शकते.

एसएसवाय खाते कोठे उघडले जाईल ? – सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत अर्जदार आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही बँक किंवा टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. या योजनेच्या मदतीने अर्जदार त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या योजनेंतर्गत केवळ दोनच नाही तर एका मुलीच्या नावे एकच खाते उघडता येईल.

कोणती कागदपत्रे द्यायची आहेत ? – सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला आपल्या मुलीचा जन्माचा दाखलादेखील फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. त्याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कोठे राहतात याचे प्रमाणपत्र (पासपोर्ट, रेशनकार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) सादर करावे लागेल.

किती व्याज मिळणार आहे – सुकन्या समृद्धि योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत खाते उघडताना व्याज दर राहील, त्याच दराने संपूर्ण गुंतवणूकीच्या काळात व्याज मिळते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट (व्याजदर बदललेले नाही) यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सरकारने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याज दरात बदल केलेला नाही.

मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सध्याच्या व्याज दराप्रमाणे 64 लाख रुपये मिळतील, जर प्रत्येक आर्थिक वर्षात 15 वर्षांसाठी 1.5 लाख रुपये जमा केले तर तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरील व्याज 41,36,543 असेल तथापि, 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते परिपक्व होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज दिले जाईल. 21 वर्षांसाठी ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपयांवर जाईल. आपणास हे लक्षात ठेवले पाहिजे की, केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत सुकन्या समृद्धि योजनेवरील व्याज ठरवते. अशा परिस्थितीत, परिपक्वतेपर्यंत व्याज दर अनेक वेळा बदलला जाऊ शकतो.

खात्याचे नूतनीकरण कसे केले जाईल ? – जर तुम्ही सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यात सातत्याने पैसे जमा केले नाहीत, तर तुम्हाला जमा रकमेवर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर मिळालेल्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळतील. आपण कोणत्याही वर्षी किमान रक्कम जमा करण्यास सक्षम नसल्यास, नंतर आपण 50 रुपये दंड देऊन पुन्हा नियमित करू शकता.