फायद्याची गोष्ट ! रोज फक्त 1 रूपया वाचवून बनवा 15 लाखांचा फंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक ग्राहकांना अनेक गुंतवणूक करण्याचे मार्ग देत असते. परंतु अशा काही गुंतवणूक असतात की, त्याचा अधिक फायदा हा ग्राहकांना होत असतो. अशीच एक सरकारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही आहे. या योजनेमध्ये रोज फक्त १ रुपया एवढी छोटी बचत करून मोठी रक्कम मिळवू शकणार आहे. दररोज १ रुपया जरी तुम्ही वाचवला तरी या योजनेत गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. महिन्याला ३ हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास ग्राहकाला योजनेच्या मुदतीनंतर तब्बल १५ लाख रुपये मिळू शकते. या योजनेबाबत जाणून घ्या.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) कोणती?
सुकन्या समृद्धी ही योजना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत सरकारने ही अल्पबचत योजना सुरु केलीय. तर दाखल केली आहे. सर्वाधिक व्याजदर असणारी ही योजना आहे. दरम्यान, प्राप्ती कर बचतीचा लाभ देखील या योजनेला मिळतो.

किमान गुंतवणूक –
केवळ २५० रुपयांनी खाते ओपन करून या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. अर्थात ग्राहकाने दररोज १ रुपयाची बचत केली तरी महिन्याला २५० ते ३०० रुपये साठतात. प्रत्येक वर्षी कमीतकमी २५० रुपये भरणे आवश्यक आहे. तर कमाल १.५ लाख रुपये यात भरता येऊ शकतात.

किती व्याज मिळते?
या योजनेमध्ये व्याजदर हा ७.६ % एवढा आहे. यावर प्राप्ती करातून सवलतीचा लाभदेखील आहे. प्रथम याचा व्याज दर तब्बल ९.२ %एवढा होता. या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर ८ वर्षांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी यातून ५० % रक्कम काढता येणार आहे.

मुदतीच्यानंतर मिळणार १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम –
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रतिमहिना ३ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षांमध्ये ३६ हजार रुपये गुंतवणूक होणार आहे. १४ वर्षांनी ७.६ % दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने ९ लाख ११ हजार ५७४ रुपये मिळतील. तसेच, २१ वर्षांच्या मॅच्युरिटीवर तब्बल १५ लाख २२ हजार २२१ रुपये मिळणार आहे. यामध्ये ७.६ % या दराने मिळणारे व्याज करमुक्त असणार आहे.

असे उघडा खाते –
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्टाच्या कोणत्याही शाखेत उघडता येते. १० वर्षे वयापर्यंतच्या मुलीच्या नावे हे खाते उघडता येते. किमान २५० ते कमाल १.५ लाख रुपये एका वर्षात भरता येतात.

इथंपर्यंत सुरु ठेवावे लागते खाते –
या योजनेतील खाते तुमची मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत अथवा १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत तुम्हाला हे खाते सुरू ठेवता येते.

आवश्यक असलेले पैसे न भरल्यास?
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये भरावे लागतात. ते भरले नाहीत तर खाते बंद होते. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी ५० रुपये दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. १५ वर्षांपर्यंत खाते बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा मिळणार आहे.