
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | नवीन वर्षात तुमच्या कन्येला द्या सुकन्या समृद्धी योजनेची भेट, जाणून घ्या पूर्ण डिटेल
नवी दिल्ली : Sukanya Samriddhi Yojana (SSY) | पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) मुलींना अनेक प्रकारचे फायदे देते, पोस्टाची योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बनवण्यात आली आहे. एक पिता किंवा एक भाऊ म्हणून तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी या योजनेत तिचे खाते उघडू शकता.
छोट्या बचत योजनांमध्ये आपले पैसे लावणार्यांसाठी पोस्ट आपल्याकडून नऊ छोट्या बचत योजना राबवते. पोस्टाच्या या छोट्या बचत योजनांपैकी समृद्धी योजना आहे. तुम्ही डिपॉझिटच्या अतिशय छोट्या रक्कमेसह या योजनेत खाते उघडू शकता. पोस्टाच्या या बचत योजनेत गुंतवणुकदारांना आपल्या बचतीवर चांगल्या व्याजदरासह सरकारी सुरक्षा सुद्धा मिळते. Sukanya Samriddhi Yojana (SSY)
याशिवाय तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. मुलींचे भविष्य उज्ज्वल ठरवण्याच्या उद्देशाने सरकारने 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. पोस्टाच्या या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेवूयात…
काय आहे डिपॉझिट करण्याची रक्कम
यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता.
हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.
सुकन्या समृद्धी खात्यात कमी वयात सुरूवात केल्यास 15 वर्षापर्यंत पैसे जमा करू शकता.
किती व्याज मिळते
या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते.
खाते उघडण्याची पात्रता
या योजनेत आई-वडील किंवा गार्डियन एका मुलीच्या नावावर केवळ एक अकाऊंट काढू शकतात.
मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे. हे अकाऊंट एखाद्या पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडू शकता.
Web Title :- Sukanya Samriddhi Yojana (SSY) | give the gift of sukanya samriddhi yojana to your daughter on this new year know the complete details of this government scheme
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- 7th pay commission | जुनी पेन्शन योजना देण्यावर विचार करतंय मोदी सरकार, जाणून घ्या कोणत्या कर्मचार्यांना होणार फायदा
- Pune Crime | कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे वर्षभरासाठी स्थानबध्द ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर MPDA ची कारवाई
- Aadhaar Card Updates | आधार कार्डमध्ये ऑनलाईन अपडेट करा आपली जन्म तारीख, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया