Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजना खात्याशी संबंधीत ‘या’ 9 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहेत का ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sukanya Samriddhi Yojana (SSY) | तुमच्याही घरात लहान मुलगी (Girl Child) असेल, तर तुम्ही केंद्र सरकार (Central Government) च्या सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana (SSY) तिच्या शिक्षणासाठी आणि विवाहाच्या वेळी एकरकमी मदत मिळवण्यासाठी गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नासाठी बचत करण्यासाठी चांगली गुंतवणूक योजना आहे (Good Investment Scheme).
1. सुकन्या समृद्धी खात्यावर कर्ज (Loan On SSY)
केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित 9 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. सर्वसाधारणपणे लोक बचत योजनेतून कर्जाची अपेक्षा करतात. सुकन्या समृद्धी योजना खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे का, असा प्रश्न आहे. याचे उत्तर नाही असे आहे. एखाद्या व्यक्तीला सुकन्या समृद्धी योजना खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर्ज मिळू शकत नाही.
2. एसएसवाय अकाऊंट ट्रान्सफर (SSY Account Transfer)
लोकांला एक सामान्य प्रश्न पडतो की सुकन्या समृद्धी खाते ट्रान्सफर करता येईल का ? उत्तर आहे होय. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही बँकेतून पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही बँकेत हस्तांतरित केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले सुकन्या समृद्धी खातेही कोणत्याही बँकेत ट्रान्सफर करता येते. Sukanya Samriddhi Yojana (SSY)
3. सुकन्या खात्यातून पैसे काढणे (How To Withdraw Money From SSY Account)
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून अंशत: पैसे काढण्याची सुविधा आहे का ? उत्तर आहे – होय, तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर सुकन्या समृद्धी खात्यातून आंशिक पैसे काढता येतील.
4. एसएसवाय खाते बंद करणे (How To Close SSY Account)
अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे लोकांना खाते वेळेपूर्वी बंद करावे लागते. अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजनेत उघडलेले खाते मुदतपूर्तीपूर्वी बंद करता येईल का ?, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर आहे – होय. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतपूर्तीपूर्वीच बंद केले जाऊ शकते.
मात्र, यासाठी काही अटी आहेत. जर मुलीचे लग्न होत असेल आणि तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सुकन्या समृद्धी खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
5. एसएसवाय खात्याची मॅच्युरिटी (What Is Maturity Period Of SSY Account)
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेल्या खात्याच्या मॅच्युरिटीबाबत लोकांमध्ये खूप संभ्रम आहे. अनेकांना हे जाणून घ्यायचे असते की सुकन्या समृद्धी योजनेत उघडलेले खाते कधी मॅच्युअर होईल ? सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेले खाते 21 वर्षांनंतर मॅच्युअर होते, असे उत्तर आहे. हा कालावधी खाते उघडल्याच्या तारखेपासून मोजला जातो.
6. एसएसवायमध्ये पैसे जमा करणे (How To deposit Money In SSY Account)
सुकन्या समृद्धी योजनेत पैसे कसे जमा करतात, या प्रश्नाबाबत लोकांना अनेकदा शंका असते. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा रोख स्वरूपात पैसे टाकू शकता.
7. सुकन्यामधील गुंतवणूक सुरक्षित आहे का ?
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे हे अनेकांना माहीत नाही. याबाबत लोकांना प्रश्न पडतो की सुकन्या योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का ? याचे उत्तर असे आहे की, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण या गुंतवणुकीची भारत सरकार हमी देते.
8. एकापेक्षा जास्त सुकन्या अकाऊंट ?
सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणुकीबाबत एक सामान्य प्रश्न असा आहे की एका मुलीच्या नावाने एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे शक्य आहे का ? उत्तर आहे – नाही. एका मुलीच्या नावाने फक्त एकच सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते.
9. गुंतवणूक न केल्याबद्दल पेनल्टी
अनेकांना हेही जाणून घ्यायचे असते की, सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात दरवर्षी रक्कम जमा झाली नाही, तर त्यावर काही दंड भरावा लागतो का ? उत्तर आहे – होय. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात दरवर्षी किमान रक्कम जमा केली नाही, तर तुम्हाला यासाठी रू. 50 दंड भरावा लागू शकतो.
Web Title :- Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi ssy account transfer of existing ac information of ssy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update