दररोज एक रुपया बचत करूनही तुम्ही उज्ज्वल करू शकता मुलीचे भविष्य; सरकारची ‘ही’ योजना फायद्याची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणली जात आहे. त्यापैकी ‘सुकन्या समृद्धी योजना’ आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी बचत करून तुमच्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करू शकता आणि या योजनेचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात.

सुकन्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीचे भविष्य सुधारू शकता. जर तुम्ही या योजनेत सहभागी झालात तर मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्नावेळी मोठी मदत मिळू शकते. या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही दररोज 1 रुपया जरी बचत केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. उच्च शिक्षण आणि लग्नासाठी बचत करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्याने मोठा फायदा होऊ शकतो आणि इन्कम टॅक्स वाचविण्यासाठीही मदत मिळू शकते.

अशी आहे ही सुकन्या समृद्धी योजना

– सुकन्या समृद्धी योजना (SSY) केंद्र सरकारची मुलींसाठी एक छोटी बचत योजना आहे. ही योजना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेशी निगडीत आहे. कमी बचतीसाठी सुकन्या योजना जास्त व्याज देणारी आहे.

– इतक्या रुपयांत केली जाते गुंतवणूक :

सुकन्या समृद्धी योजनेसाठी फक्त 250 रुपयांपासून अकाऊंट उघडले जाते. म्हणजे जर तुम्ही दररोज एक रुपया बचत केली तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

किती मिळतं व्याज

सध्या सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून 7.6 टक्के दरापेक्षा जास्त व्याज दिले जात आहे. इन्कम टॅक्सवर सूट दिली जाते.

असे उघडा खाते…

सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रांचच्या अधिकृत शाखेत जाऊन अकाउंट उघडता येऊ शकते.