ताज्या बातम्या

Sukesh Chandrasekhar Extortion Case | 200 कोटी वसुली प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी 2 सुपरस्टार ईडीच्या रडारवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचा (Sukesh Chandrasekhar Extortion Case) तपास करणाऱ्या ईडीच्या (ED) रडावर बॉलिवूडचे आणखी दोन सुपरस्टार (bollywood sar) असल्याची माहिती समोर येत आहे. दोनशे कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाचा (Sukesh Chandrasekhar Extortion Case) तपास करणाऱ्या या केंद्रीय तपास यंत्रणेच्या (Central Investigation Agency) रडारवर आता बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री आणि बॉलिवूडचा एक गायक (Bollywood singer) असल्याचे समजते. लवकरच या दोघांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दोनशे कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणात तपास करणाऱ्या ईडी चौकशीच्या फेऱ्यात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अडकण्याची शक्यता आहे. या दोघांना सुकेश याने महागडे गिफ्ट दिले होते, अशी माहिती मिळते. सुकेश चंद्रशेखर याच्याकडून या दोघांनी एका व्यापाऱ्याच्या पत्नीकडून खंडणी (Ransom) वसुल केली. त्यानंतर त्या पैशातून महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ईडी या दोन स्टारची चौकशी करण्याची शक्यता आहे.

ED कडून ज्या दोन बॉलिवूड स्टारची चौकशी केली जाणार आहे, त्यांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत.
या प्रकरणाच्या तपासावेळी चौकशीतून या दोघांची नावे वगळण्यात आली होती, असे समजते.
त्यामुळे बॉलिवूडचे ते दोन स्टार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी या प्रकरणात दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली.
ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते.
या दोघींचीही सुकेश चंद्रशेखर याच्यासमोर चोकशी केल्याची माहिती मिळते.

 

Web Title :- Sukesh Chandrasekhar Extortion Case | sukesh chandrasekhar extortion case two more bollywood star under ed scanner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button