Sukesh Chandrashekhar | ‘तिहार तुरुंगात त्यानं मला किस केलं अन्…’ अभिनेत्रीने केला सुकेश चंद्रशेखरवर गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांच्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Actress Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Actress Nora Fatehi) यांची देखील चौकशी केली जात आहे. या प्रकरणात या दोघीही अडकल्या आहेत. जेलमध्ये असूनही त्याचा थाट काही कमी नाही. तो जेलमध्ये ब्रँडेड कपडे घालत होता आणि चोवीस तास जेलमध्ये व्हिडिओ कॉलवर बोलत असायचा तसेच मे आणि एप्रिल 2018 मध्ये त्याला भेटायला तीन अभिनेत्री आल्या होत्या असा दावा दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केला आहे. आता सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) विरोधात तिसरी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत.

 

या चार्जशीटनुसार, अजून एका अभिनेत्रीनं सुकेशवर काही आरोप केले आहेत. तिने सांगितले की, “मी मे 2018 मध्ये सुकेश चंद्रशेखरला भेटले. त्यानंतर तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर पिंकी इराणीने बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून माझ्यासमोर नोटांचे बंडल फेकले आणि म्हणाली, ‘ये रख, तेरी मुंह दिखाई” तिहारमधील लोकांचे लक्ष माझ्याकडे आकर्षित होण्यासाठी चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी उर्फ एंजलने (Pinky Irani aka Angel) माझ्यासाठी IGI विमानतळावर स्कर्ट विकत घेतला होता आणि तो परिधान करायला सांगितला होता असा जबाब अभिनेत्रीनं नोंदवल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.

अभिनेत्रीनं पुढे सांगितलं, ‘तुरुंगात प्रवेश केल्यानंतर मी रडू लागले, तेव्हा पिंकीने मला ‘काहीही होणार नाही’ असे सांगितले आणि डोके खाली करून चालण्यास सांगितलं म्हणजे माझा चेहरा सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही. पुढे अभिनेत्रीनं आपल्या जबाबात म्हटलंय की, “तिला तिहारमधील एका खोलीत नेण्यात आले, ज्यामध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणं होती. त्या खोलीत एक व्यक्ती खोलीत आली ज्याने स्वतःची ओळख शेखर रेड्डी अशी करून दिली. त्यानं ब्रँडेड कपडे आणि घड्याळ घातलं होतं. पिंकी इराणीनं मला सांगितलं की, तो सन टीव्हीचा मालक आणि जयललिता यांचा पुतण्या आहे आणि वोट हॅकिंग प्रकरणामुळे तो सध्या तुरुंगात आहे.” पुढे मला इथे का बोलावलंय असं विचारताच त्याने मला सांगितल कि त्याला मी आवडते. आणि तो खूप दिवसापासून माझ्या मालिका बघतोय. त्याने माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या कोणालाच माहीत नाहीत. (Sukesh Chandrashekhar)

अभिनेत्री पुढे बोलताना म्हणाली की,” मी विवाहित आहे आणि मला दोन मुलं आहेत. तेवढ्यात सुकेश चंद्रशेखरनं मला सांगितलं की, माझ्या पतीनं मला आधीच विकलंय आणि त्याला मला वाचवायचंय.” त्यानंतर तिहार तुरुंगातील खोलीतचं सुकेशनं अभिनेत्रीला चुंबन केलं आणि मिठी मारली. मग ती तिहारमधून बाहेर आल्यानंतर पिंकीनं तीला 2 लाख रुपये दिले. त्यापूर्वी तिहारच्या त्या खोलीत सुकेशनं त्याचं घड्याळही काढून अभिनेत्रीला दिलं असल्याचं तिने काबुल केलं . 23 डिसेंबर 2018 रोजी मला सुकेशनं शेवटचा कॉल केला होता.’
मुंबईत परतल्यानंतर अभिनेत्रीला ब्लॅकमेल करून 8 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
अभिनेत्रीच्या दाव्यांच्या आधारे दिल्ली पोलिसांना चंद्रशेखरनंच तिला फसवल्याचा संशय आहे.
या सगळ्या प्रकारामुळे सुकेश चंद्रशेखर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Sukesh Chandrashekhar | sukesh chandrashekhar actress blackmail and
kiss delhi police chargesheet reveals secrets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा