Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sukesh Chandrashekhar | सध्या ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) तुरुंगात आहे. सुकेश तुरुंगात असून देखील त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहे. मुकेशच्या केसमध्ये जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi ) यांची नुकतीच ईडीनं चौकशी केली होती. मात्र आता या केसबद्दल आणखीन एक नवीन बाब समोर आली आहे.

सुकेशला (Sukesh Chandrashekhar) 200 कोटीच्या केसमध्ये अटक करण्यात आलं. तसेच त्यांनी ईडीच्या चौकशी वेळी अनेक लोकांची नावे समोर आणली. त्यामध्ये तब्बल 12 अभिनेत्री आणि सुपर मॉडेल्सचा समावेश आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही नंतर आता या केसमध्ये मात्र शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. मात्र श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी यांनी आपलं सुकेश सोबत असलेल्या संपर्काबद्दल कबूल केलं आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये श्रद्धा आणि शिल्पाच्या व्यतिरिक्त आणखीन काही अभिनेत्रींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

 

सुकेश आणि श्रद्धा कपूर 2015 पासून ओळखतात. सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) ड्रग्ज केसमध्ये श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वी अडकली होती. त्याच केसमध्ये सुकेशनी तिला मदत केल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नव्हे तर राज कुंद्राच्या (Raj Kundra ) केसमध्ये शिल्पा शेट्टीशी संपर्क केल्याचीही माहिती ईडीला दिली आहे. शिल्पाबद्दल सुकेशला विचारले असता तो म्हणाला, “शिल्पा माझी मैत्रीण आहे. मी शिल्पाला राज कुंद्राच्या केस मध्ये मदतीसाठी संपर्क केला होता.”

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसोबतच हरमन बावेजा (Harman Baweja) सुद्धा अडचणी आहे. सुकेशच्या केसमुळं जॅकलिन आणि नोरादेखील वादात अडकले आहे. त्या दोघींनी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांचावर आहे. जॅकलीनचे त्याच्यासोबत काही पर्सनल फोटो देखील आहेत. त्या दोघांचे हे पर्सनल फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Jacqueline – Sukesh Viral Photo) होत आहेत.

Web Title :- Sukesh Chandrashekhar | sukesh chandrashekhar reveals his association with shradha kapoor shilpa shetty in ed chargesheet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे.

Pune Crime | बड्या शासकीय अधिकार्‍याविरुद्ध विनयभंगाची तक्रार न देण्यासाठी 3 लाखांची खंडणी मागणार्‍या 2 महिला ‘गोत्यात’

High Blood Pressure | अनेक कारणामुळे होऊ लागते उच्च रक्तदाबाची समस्स्या, ‘या’ गोष्टी खाल्ल्याने मिळेल जबरदस्त फायदा; जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या सांगवीत भरदिवसा अंधाधुंद गोळीबार ! योगेश जगतापचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Pune Crime | हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा