‘या’ दिवशी संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होणार ‘सुखोई-30’ स्क्वाड्रन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 20 जानेवारी रोजी एसयु 30 हे लढाऊ स्क्वाड्रन हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होणार आहे. तमिळनाडूच्या तंजावरमध्ये हवाई दलाच्या तळावर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. एअर मार्शल अमित तिवारी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.

अमित तिवारी म्हणाले, “दक्षिणेतील भारतीय हवाई दलातील हे दुसरं आगाऊ लढाऊ स्क्वाड्रन असणार आहे. सुखोई 30 ताफ्यात समाविष्ट होण्याच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन 20 जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार आहेत.

‘ही’ आहे खासियत

हे लढाऊ विमान लांब पल्ला गाठण्यासोबत अनेक भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम आहे. अमित तिवारी यांनी सांगितलं की, “हवाई दलातील स्क्वॉड्रनमध्ये स्वदेशी बनावटीची ब्राम्होस मिसाईलही तैनात आहे. हवाई दलाने घोषणा केली होती की, 222 स्क्वाड्रन द टायगरशार्कसन हे सुखोईसोबत 1 जानेवारी रोजी पुन्हा उभं केलं जाणार आहे.”

पुढे बोलताना तिवारी म्हणाले, “या स्क्वाड्रनची स्थापना मुळात 15 सप्टेंबर 1969 रोजी अन्य एका सखोई लढाऊ एसयु 7 सोबत केली गेली होती. नंतर यात मिग 27 लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला. पुन्हा नव्याने उभ्या केल्या जाणाऱ्या 222 सक्वानड्रन ब्राम्होसने युक्त असं सुखोई 30 लढाऊ विमान असणार आहेत. या विमानामध्ये दोन इंजिन असणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like