रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीनं केलं आवाहन, 8 लाखाच्या ‘इनामी’ नक्षलवाद्यानं केलं ‘आत्मसर्मपण’

छत्तीसगढ : पोलीसनामा ऑनलाइन – येथील पालनारच्या एका बहिणीसाठी रक्षाबंधनाचा सण मोठा आनंद घेऊन आला आहे. या बहिणीचे नाव आहे लिंगे. 12 वर्षांचा असताना नक्षली संघटनेत सहभागी होऊन हिंसक कारवाया करणारा भावाने तिच्या आवाहनानंतर सरेंडर केले आहे. या भावाचे नाव आहे मल्ला, ज्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस होते. सुकमा जिल्ह्यातील मल्लाने आपली बहिण लिंगेच्या आवाहानाला प्रतिसाद देत सरेंडर केले. यानंतर बहिणीला प्रचंड आनंद झाला, तिने आनंदाने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली.

14 वर्षानंतर नक्षली मल्ला तामो लपत-छपत घरातील लोकांना भेटण्यासाठी आला होता. कुटुंंबाला भेटून तो परत जात होता, तेवढ्यात बहिण ढाल बणून उभी राहिली. बहिणीने त्यास परत जाण्यास रोखले. बहिण त्यास पोलिसांकडे घेऊन गेली आणि सरेंडर केले. लिंगेसाठी हे रक्षाबंधन खुपच खास आहे, कारण तिला आपल्या मोठ्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली होती. प्रवाहात परतल्यानंतर लिंगेने भावाला राखी बांधली, आरती केली. त्यास मिठाई खाऊ घातली आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

हे सर्व पोलिसांच्या विशेष अभियानांतर्गत झाले आहे. लहानपणापासूनच हिंसेच्या मार्गावर गेलेला मल्ला रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर आल्याने अधिकार्‍यांनी सुद्धा त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी यास लोन वर्राटू अभियानाचे यश म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, मुळप्रवाहात परतणार्‍यांचे स्वागत आहे. मल्लाने म्हटले, तो सध्या भैरमगढ एरिया कमिटीचा प्लाटून नंबर 13 चा डेप्यूटी कमांडर होता. तो अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभागी होता. बहिणीने बोलावल्यानंतर 14 वर्षानंतर घरी आला.

मल्लाने सांगितले की, बहिण आणि कुटुंब पाहिल्यानंतर मन बदलले आणि बहिणीच्या सांगण्यावरून पोलिसांसमोर शस्त्र ठेवले. 14 वर्षानंतर माझ्या हातावर माझ्या बहिणीने राखी बांधली. मी खुप आनंदी आहे.

तर बहिण लिंगे म्हणाली, भाऊ 12 वर्षांचा असताना काकांकडे गेला होता. काका नक्षली संघटनेत होते. त्यांनी भाऊ मल्लाला सुद्धा सहभागी करून घेतले. त्यानंतर तो परतला नाही. 14 वर्षानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा आनंद झाला. मी त्यास परत जाण्यास रोखले कारण मला त्यास एन्काऊंटरमध्ये मरताना पहायचे नव्हते. मी अनेक वर्ष भावाला राखी बांधण्यासाठी वाट पहायची. पण आता प्रत्येक वर्षी रक्षाबंधणाचा सण साजरा करणार. सरेंडरनंतर मल्ला सुद्धा खुप आनंदी आहे.