ओमानचे सुल्तान काबूस यांचं निधन, संपूर्ण जगासाठी पाकिटात ‘रहस्य’ सोडून गेले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओमानचे सुल्तान काबूस बिन सईद अल सईद यांचे वयाच्या 79 ऱ्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अरबमध्ये सर्वात जास्त सत्तेत राहिलेले सुल्तान होते. सरकारी टीव्ही चॅनलच्या ट्विटरवरुन सांगण्यात आले की रॉयल कोर्टच्या दिवानांनी शोका कारणाने तीन दिवस सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील काम बंद ठेवले आहे, तसेच पुढील 40 दिवस झेंडा खाली ठेवण्यात येणार आहे.

ओमानवर जवळपास अर्धशतक शासन करणारे सुल्तान अविवाहित होते आणि त्यांचा कोणीही वारस अथवा उत्तराधिकारी नाही. एका वृत्तानुसार ते बेल्जियममध्ये उपचार घेऊन मागील महिन्यात देशात परत आले होते.

सुल्तान काबूसने 1971 मध्ये 29 वर्षाचे असताना ब्रिटनच्या सहयोगाने अहिंसक रुपात आपल्या वडिलांचे तख्तापलट केले होते. त्यानंतर देशातील तेल संपदेचा वापर करुन देशाला विकासाच्या दिक्षेने मार्गक्रमण केले होते. शासनाच्या कार्यपद्धतीनुसार 50 पुरुष सदस्यांच्या रॉयल फेमिली कौन्सिलच्या सदस्यांनी तीन दिवसात नवा सुल्तान नेमावा लागेल.

कुटूंबाची याला मान्यता नसेल तर रक्षा परिषदेचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे चेअरमन, सल्लागार परिषद आणि राज्य परिषद एक सिलबंद लिफाफा उघडेल ज्यात सुल्तान काबूसने गोपनीय रुपात आपल्या पसंतीच्या नाव उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला नवीन सुल्तान म्हणून नियुक्त केले जाईल.

ओमानचे सर्वोच्च निर्णायक सुल्तान असतो. त्यांच्याकडे पंतप्रधान, सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि त्यांच्याकडे संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालय असते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/