‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येकाचे आयुष्यतात काहीतरी करण्याचे स्वप्न असते. परंतु , जे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवतात. ते लोक खूप कमी असतात. असेच एक स्वप्न पहिले होते. राज्यस्थानच्या एका २२ वर्षीय तरुणीने. आणि तिने ते प्रत्यक्षातही उतरवले.

सुमन राव हे या तरुणीचे नाव आहे. तिने तिचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच यावर्षीचा फेमिना मिस इंडिया हा ताज तिला मिळाला आहे. मागच्या वर्षी मिस इंडिया झालेली अनुकृती दासने हा ताज तिला घातला आहे. या पार्श्वभूमीवर फेमिना मिस इंडिया २०१९ हि स्पर्धा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/BywZMmHgaNz/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी रेमो डिसूजा, विकी कौशल, हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी उपस्थित होते. दरम्यान सुमन मागच्या वर्षी हा किताब मिळवू शकली नव्हती. परंतु या वेळेस तिच्या कष्टाला यश मिळाल आहे. आणि आता ती मिस वर्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. माझ्या आई वडिलांनी मला चांगलं घडवलं. चांगलं शिक्षण दिल त्यामुळेच मी इतपर्यंत येऊ शकले. असे मत सुमनने व्यक्त केले.

या स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक होत्या. सुमनला मिस इंडियाचा ताज मिळाला. तेलंगनाची संजना विज उपविजेती झाली आहे. आणि बिहारच्या श्रेया शंकरने मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१९ चा ताज जिंकला. तर शिवानी जाधवने मिस ग्रँड इंडिया 2019 चा किताब जिंकला. मनीष पॉल आणि माजी मिस इंडिया मानुषी, छिल्लर, करण जोहर यांनी हा शो होस्ट केला होता.

सिने जगत – 

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

चाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे चाहत्यांना ‘हे’ आवाहन

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’