Sumangalam Food and Beverage | सुमंगलम् फूड अँड बेव्हरेज माणिकचंद ऑक्सिरीच वॉटर प्लॅन्टचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sumangalam Food and Beverage | माणिकचंद ऑक्सिरीच (Manikchand Oxyrich) या नामांकित पाण्याच्या कंपनीच्या अधिकृत उत्पादन करण्याचे हक्क मिळविलेल्या सुमंगलम् फूड अँड बेव्हरेज (Sumangalam Food and Beverage) या नव्याने उभारलेल्या कंपनीचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) व आर.एम.धारिवाल फौंडेशनच्या चेअरमन शोभा रसिकशेठ धारिवाल (Shobha Rasik Sheth Dhariwal) यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी सी. एम. डी, आर. एम. डी फूड्स अँड बेव्हरेजेसच्या जान्हवी धारिवाल बालन (Janhvi Dhariwal Balan) व सी.एम.डी पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन (Puneet Balan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

 

कोरोना (Corona) काळापासून नागरिक आरोग्याला खूप जपत आहेत.रोजच्या वापरात पिण्याचे शुद्ध पाणी (Pure Drinking Water) ही आता काळाची गरज ओळखून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून शुद्ध पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.

 

माणिकचंद परिवार आणि आर एम धारिवाल फाऊंडेशनच्या (RM Dhariwal Foundation) माध्यमातून देशभरात अनेक उपक्रम घेतलें जातात. त्यामध्ये गरजू नागरिकांना देणगी, विद्यार्थ्यांना फीसाठी मदत, शैक्षणिक संस्था संघटनांना मदत, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम, हॉस्पिटल व रुग्णालयांना आधुनिक यंत्र वाटप असे अनेक उपक्रम माणिकचंद ग्रुप (Manikchand Group) करत असल्याचे फौंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारिवाल यांनी सांगितले.

 

यावेळी सुमंगलम् फुडस्चे (Sumangalam Food and Beverage) संचालक नानासाहेब जगताप (Director Nanasaheb Jagtap), पवन निवंगुणे (Pawan Nivangune), विश्वजित शिळीमकर (Vishwajit Shilimkar), पवन जांभळे (Pawan Jambhale),चंद्रकांत सवार (Chandrakant Sawar), दत्तात्रय जाधव (Dattatraya Jadhav) व विराज रुपनवर (Viraj Rupanwar) यांनी उपस्थितांचे सत्कार केले.

आधुनिक मशिनरीनी सज्ज असलेल्या या कंपनीत पाण्याच्या शुद्धीकरण व ऑक्सिजन मिश्रित शुद्ध पाणी उत्पादित यंत्रणेवर विशेष लक्ष दिले आहे.
सर्व स्वयंचलित यंत्रणांचा विशेष वापर करून वैज्ञानिक प्रयोगशाळा व विशेष तंत्रज्ञ यावर नेमलेले आहेत.

 

यावेळी नगरसेवक विशाल तांबे,दत्ता धनकवडे,आप्पासाहेब रेणुसे,काकासाहेब चव्हाण,
अभय मांढरे,लहूआण्णा निवंगुणे, रमेश बापू कोंडे,दिपक दगडे, पिंटूभाऊ धाडवे, कुलदीप तात्या कोंडे,
चेतन मांगडे, संतोष फरांदे, युवराज बेलदरे, सुधीर कोंढरे, हनुमंत परांडे, स्मिताताई कोंढरे,
आश्विनी भागवत, पदाधिकारी, मान्यवर व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Sumangalam Food and Beverage | Inauguration of Sumangalam Food and Beverage Manikchand Oxyrich Water Plant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा