Sumitomo | काही दिवसात 30% कमाईसाठी एक्सपर्ट देत आहेत सुमितोमो केमिकलचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sumitomo | बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हाला सुद्धा शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आम्ही तुम्हाला अशा शेअर्सबद्दल सांगत आहोत जे येत्या काही दिवसांत चांगला रिटर्न (Sumitomo) देऊ शकतात (Sumitomo Chemical India).
अॅग्रो केमिकल बनवणारी सुमितोमो केमिकल इंडिया ही अशीच एक कंपनी आहे. सुमितोमोच्या शेअरनी गेल्या एका वर्षात 40 टक्के रिटर्न दिला आहे. या कालावधीत निफ्टी 50 ने केवळ 9% रिटर्न दिला आहे. सुमितोमो केमिकलचे शेअर्स चांगली वाढ दाखवल्यानंतर काही दिवसांपासून थंड पडले आहेत. (Share Market Marathi News)
येत्या काही दिवसात सुमितोमोच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला चांगले उत्पन्न मिळू शकते. कीटकनाशके आणि कृषी रसायने बनवणार्या सुमितोमोचे मार्केट कॅप रू. 22,000 कोटींच्या पुढे गेले आहे. 4 मे 2022 रोजी सुमितोमोच्या शेअरनी रू. 476.70 पैशांची पातळी ओलांडली होती. (Sumitomo)
त्यानंतर शेअर बाजारातील कमजोरीमुळे सुमितोमोच्या शेअर्सवरही दबाव वाढला आहे. सोमवारी, सुमितोमोचे शेअर्स रू. 444 च्या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या 10 महिन्यांत, सुमितोमो केमिकल्सच्या स्टॉकने राउंडिंग बॉटल पॅटर्न तयार केला आहे. हा खरंतर अॅक्युम्युलेशन पॅटर्न आहे, जो शेअरमध्ये तेजीचा कल दर्शवतो. (Stock Market Marathi News)
शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सुमितोमो केमिकलचे शेअर्स रू. 405-410 च्या पातळीवर मिळाले तर ते खरेदी करूशकता. रू. 460 च्या वर बंद झाल्यानंतर, सुमितोमो केमिकलचे शेअर्स रू. 530 च्या पातळीवर जाऊ शकतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सुमितोमोचे शेअर्स रू. 400 ला खरेदी करून रू. 530 ला विकल्यास सुमारे 30% नफा नोंदवला जाऊ शकतो. (Sumitomo Chemical Share Price)
सुमितोमो केमिकल्सचे शेअर्स गेल्या काही काळापासून बुलीश पॅटर्न दाखवत आहेत आणि त्यांच्या 5, 10, 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यवहार करत आहेत. सुमितोमो केमिकल्सचे शेअर्स मार्च 2020 पासून सतत वाढत आहेत. त्यानुसार आगामी काळात सुमितोमो केमिकल्सच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेअर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Sumitomo | record high in sight sumitomo stock from agrochemical space is a good buy on dips bet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या
Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या