Summer Care | उन्हाळ्यात डायरियामुळे होऊ शकते डिहायड्रेशन, ‘या’ 4 प्रकारे करा घरगुती उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी (Summer Care) घेणे गरजेचे आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पचन (Digestion) बिघडते आणि डायरिया (Diarrhea) होऊ शकतो. डायरिया हा एक पचनाचा आजार असून त्यामुळे रुग्णाला लूज मोशन (Loose Motion), पोटदुखी (Stomach Pain), मळमळ (Nausea), उलट्या (Vomiting), ताप (Fever) आणि शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) होऊ लागते (Summer Care).

 

डायरियामुळे रुग्णाला भूक लागत नाही आणि तो खाणे-पिणे टाळू लागतो, त्यामुळे रुग्ण डिहायड्रेशनचा बळी ठरतो. वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो (Summer Care).

 

उन्हाळ्यात डायरिया म्हणजेच जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसू लागताच त्वरित उपचार सुरू करा. डिहायड्रेशनमुळे शरीरात अशक्तपणा (Weakness) वाढू शकतो, त्यामुळे या आजारावर उपचार करण्यासाठी आहारात (Diet) आवश्यक ते बदल करावेत. डायरियामुळे होणार्‍या डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

 

1. मीठ-साखरेचे द्रावण प्या (Drink Salt-Sugar Solution) :
डायरियामुळे शरीरात झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मीठ (Salt), साखर (Sugar) आणि पाण्याचे सेवन करा. या पाण्यात लिंबू (Lemon) देखील टाकू शकता. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी ओआरएस (ORS) द्रावणाचाही वापर करता येतो.

 

2. फळांचे सेवन करा (Eat Fruits) :
शरीरात झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी फळांचे (Fruits) सेवन करा. विशेषतः केळी (Banana) आणि सफरचंदचा (Apple) फायदा होईल. लक्षात ठेवा सफरचंदाची साल काढून त्याचे सेवन केले पाहिजे. सफरचंदाची साल लवकर पचत नाही कारण यावेळी पचनक्रिया कमजोर असते.

3. मूग डाळीची (Moong Dal) पातळ खिचडी खा :
मूग डाळीची खिचडी डायरियाचा सामना करण्यासाठी एक प्रभावी आहार आहे. पातळ खिचडी मऊ असल्याने पचायलाही सोपी असते.

 

4. नारळ पाण्याचे सेवन करा (Drink Coconut Water) :
नारळ पाणी (Coconut Water) शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यामुळे शरीराला ऊर्जा (Energy) मिळते आणि कमजोरी दूर होते.
जुलाब झाल्यास, तुम्ही दिवसातून दोनदा नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि अतिसारापासूनही सुटका होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Summer Care | diarrhea in summer can cause of dehydration know the prevent and treatmet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Budget 2022 | अर्थमंत्री अजित पवार यांची पुण्यासाठी मोठी घोषणा ! 300 एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी

 

Mhada Exams Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 3500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

 

Kidney Cure | हाय बीपी, पोटात वेदना आणि सूज दिसून आली तर असू शकतो किडनीसंबंधी ‘हा’ गंभीर आजार; जाणून घ्या