Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – Summer Desi Drinks | उन्हाळा सुरू होताच लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी थंडगार पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करतात, त्यामुळे साहजिकच काही काळ आराम मिळतो, मात्र अति थंड वस्तूंचे सेवन केल्याने सर्दी होण्याचीही शक्यता असते. आणि जर तुम्ही उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स (Cold Drinks), आईस्क्रीमचे (Ice Cream) सेवन करत असाल तर सर्दी आणि सर्दीसोबतच लठ्ठपणा (Obesity) वाढण्याची ही कारणे ठरू शकतात. आज आपण अशाच काही पेय पर्यायांबद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्ही घरी तयार करू शकता आणि ती कोणत्याही प्रकारे आरोग्यासाठी हानिकारक नाहीत (Summer Desi Drinks).

 

1. बेल सरबत (Stone Apple Juice)

उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेले फळ म्हणजे बेल. ज्याच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येतात. बेलमध्ये बुरशीविरोधी आणि परजीवी विरोधी गुणधर्म आहेत. हे फळ आयर्न, कॅल्शियम, गुड फॅट, फायबर, बीटाकॅरोटीन, थायामिन, रिबोफ्लेविन आणि प्रोटीन (Iron, Calcium, Good Fat, Fiber, Beta Carotene, Thiamine, Riboflavin And Protein) यांसारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

 

त्याचे फायदे (Benefits Of Summer Desi Drinks)

बेल सरबत प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचनाचा त्रास होत नाही.
बेल सरबत रक्त शुद्धीकरणाचेही काम करतो.
हा सरबत कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य ठेवण्यास मदत करतो.
उष्माघातापासून संरक्षण करतो.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

 

2. लिंबू शिकंजी (Lemon Shikanji)

व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध असलेले लिंबू शरीराला थंडावा देण्यासोबतच उष्णतेपासून संरक्षण करते. यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे संसर्गजन्य रोग दूर राहतात. लिंबू त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. लिंबाच्या सेवनाने मळमळ आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. तसेच शरीराला फ्री रॅडिकल्सपासून ते वाचवते. (Summer Desi Drinks)

 

Advt.

त्याचे फायदे

लिंबू शिकंजी पोटाला आतून गरम होण्यापासून वाचवते. त्याच्या नियमित सेवनाने उष्माघात होण्याची शक्यता कमी होते.
या पेयामुळे पचनक्रियाही योग्य राहते.
ते प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही.
त्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.
लिंबू शिकंजीमुळे श्वासाला दुर्गंधी येत नाही.
हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Summer Desi Drinks | summer desi drinks just drink these two desi drinks and keep the body cool and healthy too

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा