Summer Diet : उन्हाळ्यात ‘या’ 9 गोष्टींच्या सेवनावर आवश्य ठेवा नियंत्रण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उन्हाळ्यात लोकांना थंड-थंड वस्तू खाणे चांगले वाटते. मात्र, या हवामानात खाण्या-पिण्याची खुप काळजी घ्यावी लागते. थोडा निष्काळजीपणा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. या काळात कोणत्या वस्तू खाऊ नयेत ते जाणून घेवूयात…

ग्रिल्ड मीट –
उन्हाळ्यात उघड्या जागेत बारबेक्यूची व्यवस्था करणे काही लोकांना आवडते. आवश्यकतेपेक्षा जास्त ही आवड त्रासदायक ठरू शकते. ग्रिल्ड मीट खुप जास्त तापमानात शिजवले जाते. जास्त उन्हात हाय हिटवर बनवलेले जेवण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे कॅन्सरचा सुद्धा धोका होऊ शकतो.

आईस्क्रीम –
उन्हाळ्यात सर्वच वयाचे लोक मोठ्या आवडीने आईस्क्रीम खातात. आईस्क्रीममध्ये सर्वात जास्त शुगर असते. यामुळे लठ्ठपणा आणि डायबिटीज वाढतो, म्हणून कमी खा.

अल्कोहल
उन्हाळ्यात अनेक लोकांना थंड वाईन किंवा बर्फाने भरलेले कॉकटेल पिणे आवडते. यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि ज्यामुळे डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशनमुळे इम्यून सिस्टम कमजोर होते आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो.

डेअरी प्रॉडक्ट –
जर तुम्ही खुप जास्त कोल्ड मिल्कशेक पित असाल तर सावध रहा. या काळात डेअरी प्रॉडक्टचे सेवन कमी करावे. कारण बॉडी हिटमुळे दूध, तूप किंवा चीज पचवण्यात अडचण येते.

ऑयली फूड्स –
ऑयली फूड्स, जंक फूड्स, तळलेल्या वस्तू आणि ग्रेव्हीच्या वस्तू अनहेल्दी असतात. परंतु, उन्हाळ्यात यामुळे मोठे नुकसान होते. शरीरात यामुळे गरमी निर्माण होते. ज्यामुळे तोंडावर मुरूमे होऊ लागतात. इम्यूनिटी कमजोर होते.

ड्राय फ्रूट्स –
बदाम, अंजीर, किसमिस किंवा खजूर इत्यादी सुकामेव्यात पोषकतत्व असतात परंतु उन्हाळ्यात याचे सेवन कमी करावे. यामुळे शरीर आतून गरम होते.

जास्त चहा किंवा कॉफी-
बहुतांश लोक सकाळी-सकाळी एक कप चहा किंवा कॉफीच्या शिवाय दिवसाची सुरूवात करू शकत नाहीत. ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. तसेच डिहायड्रेशन वाढते. त्याऐवजी ग्रीन टी प्या.

मसाले –
वेलची, दालचीनी, लवंग, काळीमिरी सारखे मसाल्याचे पदार्थ सेवन केल्यास उष्णता वाढते. डिहायड्रेशन होऊ शकते आणि आजारी पडू शकता. या दिवसात साधे जेवण घ्यावे.

आंबा –
उन्हाळ्यात जास्त आंबे खाणे टाळले पाहिजे, आरोग्यासाठी ते चांगले नाही. यामुळे पोट खराब होते, डायरिया किंवा डोकेदुखी होऊ शकते. यासाठी प्रमाणात खा.