Summer Foods For Diabetes | उन्हाळ्यात 5 ड्रिंक्स, 5 भाज्या आणि 5 फळांचे डायबिटीज रुग्णांनी करावे सेवन; संपूर्ण सीझनमध्ये वाढणार नाही Blood Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Summer Foods For Diabetes | मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे, ज्यावर कोणताही इलाज नाही. त्यावर नियंत्रण ठेवूनच निरोगी जीवन जगता येते. सध्या उन्हाळा सुरू असून तो लांबणार आहे (Summer Diet Tips For Diabetes). उन्हाळ्यात दिवस जास्त असतात आणि तापमान आणि आर्द्रता वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) प्रभावित होते (Summer Foods For Diabetes).

 

चांगले हायड्रेटेड राहणे, पिष्टमय पदार्थ टाळणे आणि हाय फायबरयुक्त पदार्थ खाणे मधुमेहींना उन्हाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात (Blood Sugar Control) ठेवण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात. या दिवसात भरपूर पाणी पिण्याव्यतिरिक्त नारळ पाणी, काकडीचा ज्यूस आणि पाणीदार भाज्यांचे भरपूर सेवन करा (Summer Foods For Diabetes).

 

फिटनेस गुरू मिकी मेहता (Mickey Mehta) काही अशी पेये, फळे आणि भाज्यांबद्दल सांगतात की, ज्यांचा उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. या गोष्टींचे सेवन केल्याने केवळ ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होत नाही तर डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थता (Dehydration, Fatigue, Weakness And Malaise) यांसारखी लक्षणेही कमी होतात.

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेय (Drinks For Diabetics)

– नारळ पाणी (Coconut Water)

– विना साखरेचे लिंबूपाणी (Lemonade Without Sugar)

– गवती चहा (Herbal Tea)

– काकडीचा ज्युस (Cucumber Juice)

– चिया सीड्सचे पाणी (Chia Seeds Water)

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे आवश्यक (Must Stay Hydrated In Summer)
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल. या ऋतूमध्ये डिहायड्रेशनमुळे ब्लड शुगरच्या लेव्हलवर वाईट परिणाम होऊ शकतो. पाणी पचनास देखील मदत करते, सांध्यांना वंगण देते, घाण बाहेर काढते.

 

मधुमेह रूग्णांसाठी भाज्या (Vegetables For Diabetics)

– पालक (Spinach)

– ब्रोकोली (Broccoli)

– बीट (Beatroot)

– कोबी (Cabbage)

– फ्रेंच बीन्स (French Beans)

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भाज्या का महत्त्वाच्या (Why Vegetables Are Important For Diabetics)
हिरव्या आणि पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. पिष्टमय भाज्या ब्लड शुगर लेव्हल वाढवतात. ब्रेड, तांदूळ आणि बटाटे (Bread, Rice And Potato) यामध्ये स्टार्च असते आणि त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल बिघडू शकते. फायबर युक्त भाज्या ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

 

मधुमेहाच्या रूग्णांसाठी फळे (Fruits For Diabetics)

– स्ट्रॉबेरी (Strawberry)

– संत्रे (Orange)

– पीच (Peach)

– नाशपाती (Pears)

– आलुबुखार (Prunes)

शुगरच्या रुग्णांसाठी फळे का आवश्यक (Why Fruits Are Necessary For Diabetics)
फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हेच कारण आहे की ब्रेडसारख्या इतर कार्बोहायड्रेट पदार्थांच्या तुलनेत फळांमुळे ब्लड शुगर लेव्हलमध्ये तीव्र वाढ होत नाही. दुसरे म्हणजे, या फळांमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण असते, त्यामुळे ती पोटही निरोगी ठेवतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Summer Foods For Diabetes | according to holistic expert include 15 drinks foods and vegetables in your diet during summer to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Soaked Fig Benefits | रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा अंजीर, शरीरात वाढेल आयर्न-कॅल्शियम, 5 आजार होतील दूर

 

Health Alert | पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर अतिशय धोकादायक, कॅन्सरसह अनेक आजार होण्याची शक्यता; जाणून घ्या

 

Diabetes Causing Foods | असाध्य आजार डायबिटीजचे मूळ आहे रोजच्या खाण्यातील ‘या’ 6 गोष्टी, माहित असूनही बिनदिक्कतपणे खातात लोक