उन्हाळ्यात ‘या’ 5 फळाचं सेवन नक्की करावं, शरीरात नाही राहणार कशाचीही कमी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : उन्हाळ्यात फळांकडे पाहून खाण्याचा मोह आवरला जात नाही. असे वाटते की ही सर्व फळे एकत्रच खाऊन फस्त करावीत. टरबूज, खरबूज आणि आंब्याकडे पाहिल्यास असेच वाटते. ही फळे जितकी सुंदर दिसतात ती तितकीच रसाळ देखील असतात. तसेच त्यांच्यात पौष्टिक तत्वांचा साठा देखील भरमसाठ असतो. उन्हाळ्यात या फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते, तसेच ही रसाळ फळे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात प्रत्येक कानाकोपऱ्यात आढळणाऱ्या या 5 फळांचे फायदे जाणून घेऊया.

आंबा
सर्व प्रथम आपण फळांचा राजा म्हणजे आंब्याबद्दल बोलूया. आंब्याला असेच नाही फळांचा राजा म्हटले जाते. आंब्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक असतात. यासह पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम खनिजे देखील समृद्ध असतात. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास मदत करते. या कारणास्तव आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.

टरबूज
बाहेरून हिरव्या रंगाचे दिसणारे आणि आतून लाल रंगाच्या असणाऱ्या टरबूजबद्दल बोलूया. हे फळ दिसायला जितके सुंदर असते, तितकेच ते उन्हाळ्यात फायदेशीर असते. टरबूजमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. जे शरीरातील पाण्याची आवश्यक पातळी राखण्यास मदत करते.

खरबूज
खरबूज हे टरबूजासारखेच रसाळ असते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त फायबर आणि फॉलिक अ‍ॅसिड सारख्या घटकांचा समावेश आहे. ते शरीरासाठी फायदेशीर आहे. दररोज खरबूजचे सेवन आपल्या हृदयासाठी तसेच आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहे.

संत्री
उन्हाळ्यात आंबा, टरबूज आणि खरबूज व्यतिरिक्त मनाला सर्वात जास्त आकर्षित करणारे फळ म्हणजे संत्री होय. हृदयाशी संबंधित आजारांव्यतिरिक्त संत्री मधुमेहापासून सुटका करण्याचे देखील काम करते. यास सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवण झाल्यानंतर लगेच खाऊ नये. असे केल्याने ते हानिकारक ठरू शकते.

द्राक्ष
शेवटी, द्राक्षांबद्दल बोलूया. द्राक्षांमध्ये देखील पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. ते हाडांमध्ये कॅल्शियमची पातळी वाढवतात. याशिवाय जास्त पाण्यामुळे शरीरही हायड्रेटेड राहते.