उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे ‘हे’ सोपे फंडे एकदा वापरून पहाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या असहाय्य उन्हाळयाला सुरुवात झाली आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की सकाळी नऊ वाजल्यानंतर घरातून बाहेर पाय काढवत नाही. पण घरात देखील वातावरण उष्णच असते. मग आपसूकच फॅन,कुलर किंवा एसी असे पर्याय वापरले जातात. लाईटशिवाय ही उपकरणे चालत नाहीत. पण मित्रांनो आज नैसर्गिक रित्या भर उन्हाळ्यातही तुम्ही तुमचे घर कसे थंड ठेऊ शकता याचे काही सोपे फंडे पाहुया. तुम्ही सध्या पत्र्याच्या घरात राहता असाल किंवा मग बंगल्यात गर्मीपासून सुटका करुन घेण्यासाठी हे फंडे तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.

१) जिथे झाडं तिथे थंडावा

जिथे हिरवळ म्हणजेच झाडं असतात तिथल्या वातावरणात नेहेमी थंडावा असतो. हिरवळ थंडावा देण्यासोबतच आपल्या मनाला शांत देखील ठेवते. म्हणून ह्या उन्हाळ्यात आपल्या घराची रूपरेखा जरा बदला आणि त्यात झाडांना प्राधान्य द्या. ह्यासाठी तुम्ही तुमच्या लिविंग रूमध्ये हिरव्या झाडांचा समावेश करू शकता. ह्याने तुमचं घर थंड आणि प्रसन्न राहिलं.

२) टेबल फॅन -बर्फ आणि पाणी

रूम थंड ठेवण्यासाठी ही सर्वात परवडणारी आणि सहजपणे करता येणारी ट्रिक आहे. टेबल फॅन समोर वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे एका मोठ्या जाळीदार धातूच्या भांड्यात बर्फ घ्या. भांड्यातून पडणारे पाणी साठवण्यासाठी दुसरे भांडे ठेवा. फॅन मधून येणारी हवा भांड्यातील बर्फाला स्पर्श करून जाईल त्यामुळे त्या खोलीतील हवा देखील थंड होईल. पण फॅन ही इलेकट्रीक वस्तू असल्यामुळे योग्य ती काळजी घ्या.

३) योग्य लाईटसचा वापर करा

उन्हाळ्यात त्या गोष्टींपासून आवर्जून दूर राहिलं पाहजे ज्या उष्णता वाढवतात. जसे की घरातील लाईट्स. गरज नसताना घरातील लाईट्स बंद ठेवावे, कारण लाईट्स मधून उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या घरातील तापमान वाढू शकतं. आणि तसेही गरज नसताना लाईट्स बंद ठेवल्याने तुमचे विजेचे बिल देखील कमी येईल. तसेच घरात चुकीच्या लाईट्सचा वापर टाळा. म्हणजे पिवळ्या बल्ब एवजी LED किंवा CFL लाईट्सचा वापर करा.

४)नैसर्गिक एअर कंडिशनर

उन्हाळयाच्या दिवसात विजेचा वापर न करता खोली थंड ठवण्यासाठीचा हा सर्वात उत्तम,सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. तुमच्या खिडकी समोर एखादा ओला कपडा टांगून ठेवा. त्यामुळे खिडकीतून येणारी हवा या पडद्याला स्पर्श करून जाईल. त्यामुळे रूम मधील हवा देखील थंड होईल. ही पद्धत म्हणजे नैसर्गिक एअर कंडिशनर सारखी आहे.

५)विंडो प्लांटेशन

जर तुमच्या घराला छान मोठी बाल्कनी किंवा खिडकी असेल तर तुम्ही तिथे देखील झाडं लावू शकता. म्हणजे बाल्कनी गार्डन तयार करू शकता, किंवा विंडो प्लांटेशन करू शकता. ह्यामुळे तुमच्या घरात नेहेमी थंडी हवा येईल. आणि तुमची बाल्कनी आणि खिडकीही सुंदर दिसेल.

६)DIY एअर कंडिशनर्स

उन्हाळ्याचा सर्वाधिक त्रास ह्या पत्र्याचा घरात राहणाऱ्या रहिवाशांना होतो. बांग्लादेशातील आशीष पॉलने इको-कूलर नावाची एक चतुर शीतकरण प्रणाली तयार केली, ज्याला वीजची आवश्यकता नसते आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बांधली जाऊ शकते. काही मूलभूत DIY साधनांसह हे काही तासांतच बनवले जाऊ शकते.

इको कुलर बनवण्यासाठी यावर माहिती मिळावा

https://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3635710/How-cool-apartment-free-Electricity-free-DIY-aircon-uses-old-plastic-bottles-used-used-25-000-Indian-homes.html

७)क्रॉस व्हेंटिलेशन

तुमच्या घरात सूर्याच्या विरुद्ध दिशेने असलेले खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवा. ह्याने तुमच्या घरात थंडी हवा येईल. ह्याला Cross Ventilation असे म्हणतात. जर हे तुम्ही सकाळी आणि सायंकाळी केलं तर तुम्हाला नक्की ह्याचा परिणाम जाणवेल.