Summer Vegetables | उन्हाळ्यात ‘या’ 10 भाज्या आवश्य खा, जाणून घ्या याचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात Summer खाण्या-पिण्याकडे थोडे जरी दुर्लक्ष केले तरी महागात पडते. उष्ण हवामानात शरीर थंड ठेवण्यासाठी केवळ एसी, कूलरच नव्हे तर चांगल्या आहाराची सुद्धा गरज असते. उन्हाळ्यात Summer खाल्ल्या जाणार्‍या 10 भाज्या ज्या शरीरी थंड ठेवतात आणि उन्हाळ्याशी Summer लढण्यास मदत करतात त्यांच्याविषयी जाणून घेवूयात…

फायद्याची गोष्ट ! एकाच दिवसात बनाल ‘लखपती’, 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची ‘सुवर्णसंधी’, जाणून घ्या

1 दुधी –
दुधी भोपळ्यात भरपूर पोषकतत्व असतात. यामध्ये कॅल्शियम असते, ते हाडांसाठी चांगले आहे. पोटाच्या समस्या, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगरवर दुधी उपयोगी आहे.

2 हिरवे बीन्स –
बीन्समध्ये कॅलरी खुप कमी असते. वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. यातील फायबरमुळे पोटाच्या समस्या दूर राहतात. हाडांसाठी चांगले आहे. पोषकतत्व भरपूर आहेत.

3 वांगे –
वांग्यात फायबर भरपूर असल्याने पोट आणि आतड्यांसाठी चांगले आहे. यात फ्लेवोनॉईड्स, व्हिटॅमिन, पोटॅशियम असते. शरीर थंड राहते.

4 कारली –
कारली हृदय आणि पोटासाठी औषधासारखे आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, आयर्न आणि पोटॅशियम असते. पचनशक्ती वाढते. ब्लड शुगर नियंत्रित राहते.

5 काकडी –
यात अनेक पोषकतत्व आहेत. उन्हाळ्यात शरीर थंड राहते. अँटीऑक्सीडंट, व्हिटॅमिन सी आढळते. शरीर हायड्रेटेड राहते.

Hasan Mushrif | ‘राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत अन् आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार’

6 हिरव्या पालेभाज्या –
पालक, चवळी, पुदीना या भाज्या उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत. यात फोलेट आणि पाणी भरपूर असते. उन्हाळ्यात पोट हलके राहते.

7 सिमला मिरची –
हिरवी, लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीत भरपूर पोषकतत्व असतात. फायटोकेमिकल्समुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते. उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे.

8 भोपळा –
भोपळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. इम्यून सिस्टम मजबूत होते. अँटीऑक्सीडेंट, बीटा-कॅरोटीनमुळे शरीराचे तापमान थंड राहते, हृदयासाठी चांगला आहे.

9 टोमॅटो –
शरीर हायड्रेट राहते. यातील लायकोपीनमुळे अनेक आजार दूर राहतात. पोटॅशियम आणि कॅल्शियम असते.

10 गाजर –
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यातील फायबर शरीर आतून स्वच्छ करते.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत