जावयाने सासुची हत्या करून इमारतीवरून खाली फेकले 

ठाणे :  पोलीसनामा आॅनलाइन

 

मद्यपी जावयाने स्प्रेची बाटली डोक्यात मारून सासुची हत्या केली. त्यानंतर त्याने सासूला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकल्याचा धक्कादायक ठाण्यातील घोडबंदर रोडवरील रुमा बाली या उच्चभ्रू संकुलात घडला आहे.

[amazon_link asins=’B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8b932f0-b671-11e8-816c-33ab8287aeba’]

कमलजीत कौर सामलोग (६८) रा. हिरानंदानी इस्टेट असे मृत महिलेचे नाव असून, ती आपल्या कर्णबधीर विवाहित मुलीला जावयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत जाब विचारण्यासाठी आली होती. या घटनेच्या दिवशी मुलीने पतीबाबत माहेरी तक्रारी केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कमलजीत कौर ह्या रुमा बाली संकुलात आल्या होत्या.

पुणे : मानलेल्या भावाकडूनच विवाहीत बहिणीवर बलात्कार 

यावेळी दारूच्या नशेत असलेल्या भट्टीने सासूलाच शिवीगाळ करत तिच्या डोक्यात स्प्रेची बाटली मारली. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतच त्यांना पकडून थेट बेडरूमच्या खिडकीतून इमारतीखाली फेकून देत त्यांची हत्या केली. याप्रकरणी, पोलिसांनी भट्टी याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जाहिरात.