सुर्य झाला ‘डीम’ ! 5 पटीनं कमी झाला ‘प्रकाश’, कारण शोधतायेत शास्त्रज्ञ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत की पृथ्वीला सर्वाधिक ऊर्जा देणारा आपला सूर्य कमी चमकत आहे. त्याचा प्रकाश कमी झाला आहे. आकाशगंगेतील त्याच्यासारख्या इतर तार्‍यांच्या तुलनेत सूर्य कमकुवत झाला आहे. थोडा नाही, तर खूपच कमकुवत झाला आहे. आता शास्त्रज्ञ शोधत आहेत की असे का घडले?

सूर्य हा पृथ्वीचा एकमेव उर्जा स्त्रोत आहे. परंतु गेल्या ९००० वर्षांपासून तो सतत कमकुवत होत चालला आहे. त्याची चमक कमी होत आहे. असा दावा जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या अवकाश वैज्ञानिकांनी केला आहे.

मॅक्स प्लँक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या केपलर स्पेस टेलीस्कोपच्या डेटाचा अभ्यास करून याचा खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की आपल्या आकाशगंगेतील सूर्यासारख्या इतर ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याची चमक कमी होत आहे.

शास्त्रज्ञांना अद्याप हे समजू शकलेले नाही की, ही एखादे वादळ येण्यापूर्वीची शांतता तर नाही. सूर्य आणि त्याच्या इतर ताऱ्यांचा अभ्यास त्यांचे वय, चमक आणि रोटेशन याच्या आधारावर केला गेला आहे. गेल्या ९००० वर्षात त्याची चमक पाच पट कमी झाली आहे.

मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक डॉ. अलेक्झांडर शापिरो यांनी सांगितले की, आम्हाला आश्चर्य वाटते की आपल्या सूर्यापेक्षा आकाशगंगेमध्ये अधिक सक्रिय तारे उपस्थित आहेत. आम्ही सूर्याची त्याच्यासारख्या २५०० तार्‍यांशी तुलना केली आहे, त्यानंतर या निष्कर्षावर पोहोचलो आहोत.

सूर्याबद्दल हा अहवाल तयार करणारे दुसरे वैज्ञानिक डॉ. टिमो रेनहोल्ड यांनी सांगितले की गेल्या काही हजार वर्षांपासून सूर्य शांत आहे. आम्ही याची गणना सूर्याच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या सौर स्पॉट मधून करतो. पण गेल्या काही वर्षांत सौर स्पॉट संख्याही कमी झाली आहे.

१६१० पासून सूर्यावरील सौर स्पॉट सतत कमी होत आहेत. मागील वर्षी सुमारे २६४ दिवस सूर्यात एकही स्पॉट बनताना दिसला नाही. जेव्हा सूर्याच्या मध्यभागी तीव्र उष्णतेची लाट येते तेव्हा सौर स्पॉट तयार होतात. यामुळे मोठा स्फोट होतो. अंतराळात सौर वादळ येते.

डॉ. टिमो रिनहोल्ड यांनी सांगितले की जर आपण सूर्याच्या वयाची तुलना ९००० वर्षे केली तर तो खूपच कमी वेळ आहे. हलक्या अंदाजात असे सांगता येऊ शकते की सूर्य थकला आहे आणि तो थोडीशी झोप घेत आहे.

असे मानले जाते की सूर्य ४.६ अब्ज वर्ष जुना आहे. त्या तुलनेत ९००० वर्षे काहीच नाहीत. या अभ्यासात मॅक्स प्लँक संस्थेने ऑस्ट्रेलियाची न्यू साउथ वेल युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कोरियाच्या स्कूल ऑफ स्पेस रिसर्चला देखील समाविष्ट केले आहे.

या अभ्यासामध्ये सामील असलेले डॉ. समी सोलंकी यांनी सांगितले की, कोणत्याही ताऱ्याचे त्याच्या अक्षावर फिरणे त्याच्या चुंबकीय क्षेत्राची शक्ती दर्शवते. जर चुंबकीय क्षेत्र मजबूत असेल तर ताऱ्याचे केंद्र आणि पृष्ठभागाच्या क्रिया योग्य आहेत. यातून सूर्य किती रेडिएशन करत आहे हे समजते. किती चमकत आहे आणि आगीचे स्फोट होत आहेत की नाहीत.

डॉ. सोलंकी म्हणाले की जर सूर्यप्रकाश कमी झाला असेल, तेथे आगीचे कोणतेही स्फोट नाहीत. सौर स्पॉट तयार होत नाहीत. तेव्हा याचा अर्थ सूर्य इतर तार्‍यांपेक्षा निश्चितच कमकुवत झाला आहे. त्याची चमक मंदावली आहे.