पुण्यातील सिंहगड रोडवरील ‘सन ऑरबीट’ची पूरग्रस्तांना ‘भरघोस’ मदत, ‘अबाल-वृध्दां’चा पुढाकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील आनंदनगर येथील सन ऑरबीट अपार्टमेंट मार्फत आज (सोमवार) गहू, तांदूळ, फरसान, पॉपकॉर्न, तेल, बिस्कीट, पोहे, आटा, सॅनिटरी नॅपकीन अशी एक लाख रुपयांच्या वस्तूंची मदत पाठवण्यात आली.
Sun-Orbit
सांगली, कोल्हापूर आणि परिसरात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. या परिस्थितीत त्यांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत सन ऑरबीट अपार्टमेंट मार्फेत करण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यामुळे शेकडो कुटुंबांना घराबाहेर पडावे लागले आहे. या सर्व नागरिकांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन आनंद गिल्डा यांनी नागरिकांना केले आहे.
Sun-Orbit
सन ऑरबीट अपार्टमेंट कडून पूरग्रस्तांसाठी तांदूळ (९० किलो), आटा (१०० किलो), तेल (१० डबे), तुरडाळ (५० किलो), मुगडाळ (५० किलो), मसुरडाळ (२५ किलो), वाटाणा (२५ किलो), शेंगदाणे (२५ किलो), रवा (२५ किलो), पोहे (३० किलो), तिखट (२० किलो), मिठ (१०० किलो), हळद (१० किलो), दूध पावडर (२० पाकीट), अख्खा मसूर (१५ किलो), कोलगेट (१२० पाकीट) या वस्तू मदत स्वरूपात देण्यात आली. तब्बल टेम्पोभर साहित्य कोल्हापूरकडे सकाळी रवाना करण्यात आले. या सर्व वस्तु योगेश हनमघर (पुरेपूर कोल्हापूर )आणि आधार फौंडेशन यांच्या मार्फत सांगली आणि कोल्हापूर ला पाढवण्यात आल्या .
यांनी केली मदत

आनंद गिल्डा, विश्वनाथ जाधव, ओमप्रकाश राजपुरोहीत, विकास दळवी, अनिल माने, प्रकाश आठवले, जगदिश सवदिकर, सतिश विधाते, राहुल दुधाने, कृष्णा दाभाडे, धिरज हंसनाळकर, मिलींद पवार, डॉ. वाडेकर, विठ्ठल हनमगर, पाठक, राजकुमार व्यवहारे, सायली पिंगळे, किरण उंडुरे, ललीत सुपर मार्केट, निर्मला सुतार, दिपक जडिया, राहुल शाह, नितीन ठुणे, राकेश गौड, हर्षद लिमये, डॉ. दत्ता पाटील, कैलास गायकवाड, राहुल तांबे, सोनू खोंड, नाडगौडा, विमल व विठ्ठल राईकवार, नळनीकर, अमित टिपरे, अमोद बर्वे, शंतनु काटकर, अभिजीत डांगरीकर, कैलास नावंधर, प्रभाकर क्षिरसागर, आनंद तातुसकर, सुनिल चाटेकर, अजय भुरे, मुकुंद परदेशी, धनंजय पाटील, बबलू, ललीत बेंद्र, विजय देशपांडे, विक्रम जपे, अवटे, गौरी धर्माधिकारी, सविता पोटे, जाधव तसेच अर्पटमेंटमधील इतरांनी आर्थिक आणि वस्तूंची मदत केली.

आरोग्यविषयक वृत्त