‘कोरोना’ रूग्णांसाठी ‘सन फार्मा’नं कमी दरात लाँच केलं औषध, ‘फ्लूगार्ड’ची 1 टॅबलेट 35 रूपयांना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजने मंगळवारी सौम्य प्रकारचे लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयोगी पडणाऱ्या फेविपिराविर या औषधास लाँच केले आहे. फेविपिरावीर (200 मिलीग्राम) ला कंपनीने ब्रँड नाव फ्लूगार्ड असे देऊन या औषधास प्रति टॅबलेट 35 रुपयांच्या किंमतीला बाजारात उपलब्ध करून दिले आहे.

फेविपिराविर हे एकमेव ओरल अँटी-व्हायरल औषध आहे जे सौम्य ते मध्यम लक्षण असणाऱ्या कोरोना रूग्णांसाठी मंजूर झाले आहे. सन फार्माच्या भारतीय व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती गणोरकर म्हणाल्या, ‘देशात सध्या कोरोना विषाणूची 50 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे येत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांना उपचारांसंबंधित अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.’

त्या म्हणाल्या, ‘आम्ही फ्लूगार्डला परवडणार्‍या दराने सुरू करीत आहोत जेणेकरून अधिकाधिक रूग्णांपर्यंत ते पोहोचू शकेल आणि त्यांच्यावर आर्थिक ओझे कमी पडेल. हे साथीच्या विरूद्ध आपल्या भारताच्या प्रतिसादाच्या समर्थनतेखाली आहे. देशभरातील रूग्णांना हे औषध उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायाबरोबर काम करेल.’ फ्लूगार्डला या आठवड्यात बाजारात उपलब्ध करण्यात येईल.

यापूर्वी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीने हे औषध भारतात सुरू केले होते. कंपनीने प्रारंभी प्रति टॅबलेटची किंमत 103 रुपये ठेवली. नंतर कंपनीने टॅबलेटचे दर 27 टक्क्यांनी कमी करून किंमत 75 रुपये प्रति टॅबलेट केली. याची किंमत रशियामध्ये प्रति टॅबलेट 600 रुपये, जपानमध्ये 378 रुपये, बांग्लादेशात 350 रुपये आणि चीनमध्ये प्रति टॅबलेट 215 रुपये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like