Sun Tan Remedies | टॅन स्किन घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेच प्रमाण वाढलं आहे. घराबाहेर पडायचं म्हटलं तरी नकोनकोस होतं. (Sun Tan Remedies) कारण घराबाहेर पडलं की, सूर्याच्या अतिउष्ण किरणांमुळे आपली त्वचा काळवंडते म्हणजेच टॅन (Sun Tan) होते आणि हाच काळेपणा घालवण्यासाठी अनेकजण महागड्या क्रिमही वापरत असतात (Sun Tan Remedies). परंतू आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ते केल्याने तुमचं टॅनिंग कमी होईल (Home Remedies For Sun Tan).

 

1. बेसन आणि दही (Gram Flour And Curd)
टॅन घालवण्यासाठी बेसन आणि दही घालून फेस पॅक बनवा. यासाठी एक चमचा बेसनामध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा हळद मिसळून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ती पेस्ट जो भाग टॅन झाला आहे. अशा ठिकाणी लावा. कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. यामुळे टॅनिंगची समस्या काही प्रमाणात कमी होईल. सोबतच हा पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यालाही लावू शकता.

 

2. कोरफड आणि मध (Aloe Vera And Honey)
जर तुमची त्वचा कोरडी (Dry Skin) असेल तर एक चमचा एलोवेरा जेलमध्ये एक चमचा मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे सनबर्नच्या जळजळीपासून तुम्हाला आराम मिळेल आणि टॅनिंगही दूर होईल.

3. या व्यतिरीक्त तुम्ही एक चमचा मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस (Lemon Juice) मिसळून पेस्ट बनवा.
हा पॅक टॅन झालेल्या भागात लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तो धुवून टाका.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Sun Tan Remedies | easy 5 home remedies to get rid of sun tan or sun burn

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Ahmadnagar Crime News | भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! भावाचा सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज