13 फेब्रुवारीला ‘सुर्या’चं राशी ‘परिवर्तन’, ‘या’ राशींना मिळणार ‘मान-सन्मान’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभात संक्रमण करणार आहे. या राशीमध्ये १४ मार्चपर्यंत सूर्य स्थित असणार आहे. यानंतर सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या संक्रमणामुळे चार राशीच्या लोकांना त्यांच्या सामाजिक जीवनात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. जाणून घेऊया या चार राशी…

मिथुन
सामाजिक जीवन अधिक चांगले होणार असून मान-सन्मान वाढेल. तसेच तुम्हाला संपत्ती व अन्नधान्याचा फायदा होईल आणि विविध कामांमध्ये यश मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावणार आहे. तसेच सरकारी क्षेत्रातून चांगल्या नफ्याचे योग जुळून येणार आहेत.

कर्क
आपल्याला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे या काळात आपल्या वडिलांची तब्येतही अगदी खराब होऊ शकते, म्हणूनच आपल्याला त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. जे कुणी कायद्याच्या विरोधात असतील त्यांना प्रशासनाकडून शिक्षा देखील होऊ शकते.

सिंह
आपले आरोग्य अतिशय ताजेतवाने असणार आहे आणि आपणास पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त वाटेल तसेच कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्येपासून मुक्तता मिळणार आहे, तर दुसरीकडे या काळात विवाहित जीवनात काही समस्या उद्भवू शकतात.

कन्या
आपल्याला विविध प्रकारच्या न्यायालयीन खटल्यांमध्ये चांगले निकाल मिळतील आणि आपण आपल्या विरोधकांना धूळ चाटण्यास यशस्वी ठराल. खर्चाच्या बाबतीत समतोल राखाल आणि या काळात आपण फक्त आवश्यक खर्च कराल यामुळे आपली आर्थिक स्थिती देखील बळकट होईल.