Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sunanda Pushkar Death Case | काँग्रेस नेते (Congress Leader) आणि लोकसभा खासदार शशी थरुर (MP Shashi Tharoor) यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी (Sunanda Pushkar Death Case) दिल्ली कोर्टाने (Delhi court) निर्दोष मुक्तता (acquitted) केली आहे. यामुळे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरुर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. थरुर यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शशी थरुर आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत (Suicide) केल्याचा आरोप थरुर यांच्यावर लावला होता. यामुळे दाशातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. न्यायालयाने थरुर यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर शशी थरुर यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी यावेळी सांगितले की, मागील साडेसात वर्षापासून या प्रकरणात मला यातना आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या.

सुनंदा पुष्कर यांचा 17 जानेवारी 2014 मध्ये दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी पुष्कर यांनी पती शशी थरुर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी (Pakistani journalist) अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम 307, 498 ए अंतर्गत शशी थरूर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि तिच्याशी क्रूरतेने वागल्याचा आरोप शशी थरूर यांच्यावर होता.

 

विषामुळे झाला सुनंदा यांचा मृत्यू

सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरण हे देशातील अत्यंत हायप्रोफाईल प्रकरण मानलं जात होतं. 29 सप्टेंबर 2014 रोजी एम्सच्या वैद्यकीय टीमनं (AIIMS medical team) सुनंदा यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना (Delhi Police) दिला होता. ज्यामध्ये सुनंदा यांचा मृत्यू विषानं झाल्याचे म्हटले होते. संबंधित वैद्यकीय टीमनं असेही म्हटले होते की, सुनंदा यांच्या पोटात असे अनेक रसायने आढळून आली आहेत. जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात मिसळल्यानंतर त्याचे विषामध्ये रुपांतर होते.

Web Title :- Sunanda Pushkar Death Case | congress leader shashi tharoor acquitted in sunanda pushkar death case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट

LPG Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; 25 रुपये द्यावे लागणार जादा

Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी