शशी थरूर ‘पाक’च्या महिला पत्रकारासोबत ‘रात्र’ घालवत होते, सुनंदा पुष्कर नाराज होत्या असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं

नवी दिल्ली – काँग्रेस नेते शशी थरूर हे आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर चांगलेच गोत्यात आले आहेत. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, पाकिस्तानी पत्रकार मिहीर तरार सोबत असलेल्या थरूर यांच्या संबंधामुळे सुनंदा पुष्कर यांच्याशी नेहमी वाद होत असत. सुनावणी मध्ये सुनंदा पुष्कर यांना थरूर यांनी आत्महत्येसाठी उकसावल्याचा आरोप दाखल झाला पाहिजे. यादरम्यान दोघात सर्व काही आलबेल नसल्याचे घरातील नौकराने सांगितल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी सांगितले की जर न्यायालने आदेश दिला तर थरूर यांच्या विरोधात खुनाचा खटला चालवला जाऊ शकतो.

सुनंदा यांचा मुलगा, भाऊ आणि मित्र यांनी काय म्हटलं होतं
सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन याने सांगितले होते की, माझी आई आत्महत्या करू शकत नाही. तसेच पुष्कर यांच्या भावाने सांगितले होते की, माझी बहीण खूप उद्विग्न अवस्थेत असायची. हे त्यांनी लिहिलेल्या एका मेल मधून स्पष्ट हेते. की सुनंदा या मानसिक तणावात होत्या. दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले की, थरूर यांच्या मोबाईल मध्ये एक असा मेसेज होता ज्यावरून हे समजून येते कि ते मिहीर तरार यांच्याशी लग्न करणार होते आणि सुनंदा यांना तलाक देणार होते. सुनंदा यांनी थरूर यांचा मोबाईल फोन बघितल्यामुळे त्यांना खूप काही समजलं होतं. तसेच थरूर हे पाकिस्तानी पत्रकार मिहीर यांच्या संपर्कात होते असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सहसा थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचे पाकिस्तानी पत्रकार मिहीर तरार सोबत असलेलले संबंध यावरून दोघांत सतत वाद होत असत. सुनंदा यांचा मित्र सुनील टकरू यांनी दिलेल्या जबाबावरून सुनंदा यांनी थरूर यांना एक्सपोज करण्याची धमकी दिली होती. त्यांच्या शव विच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे काहीच कारण दिसून आले नव्हते. एक सामान्य रिपोर्ट आला होता. ना की शुगर ना कार्डियाक वैगेरे असे काहीच नव्हते.

पुष्कर यांचा अनैसर्गिक मृत्यू
पोलिसांनी पहिल्या शवविच्छेदन अहवालानुसार अल्प्राजोलम प्वाइजनिंग असल्याचे सांगितले. शरीरावर १५ निशाण हे मृत्यूच्या ४ तास ते ४ दिवस अगोदरचे होते. एक तर पॉइजन खाल्लं असणार अन्यथा इंजेकशनच्या माध्यमातून दिले गेले असणार असे सांगितले. फॉरेन्सिक लॅबच्या एका अहवालानुसार सुनंदा पुष्कर या मानसिकरीत्या तणावात होत्या. काही दिवसापासून जेवन बंद होते. सारखं नशापान चालू होतं. हा एक अनैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगिलते होते. आता दिल्ली पोलिसांनी आपली बाजू दिल्ली न्यायालयात मांडून पूर्ण झाले आहे. येत्या १९ ऑक्टोबरला पुढची सुनावणी आहे. त्यावेळी थरूर यांचे वकील त्यांची बाजू ठेवतील.

आरोग्यविषयक वृत्त –