पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होऊच  देणार नाही ; पोलिस अधीक्षकांना निवेदन

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन: पुण्यातील बावधन ,येथील ऑक्सफर्ड गोल्ड क्लब रोड , येथे आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिव्हल ला  पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन समितीद्वारे पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. हा सनबर्न फेस्टिव्हल २९ते ३१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नक्की काय आहे  दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे…  
–  पुणे शहरात दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस आणि महाराष्ट्र शासन ध्वनिप्रक्षेपणाबाबत शांतता झोन ५० डेसिबल ,निवासी झोन ५५ डेसिबल आणि वाणिज्य झोन ६५ डेसिबल ,औद्योगिक झोन ७५ डेसिबल प्रमाणे  मर्यादा घालण्यात आली आहे का ?
– दहीहांडी आणि गणेशोत्सव प्रमाणे सनबर्न फेस्टिव्हलमध्ये चार स्पीकर लावण्याची मर्यादा घालण्यात आली आहे का ?
– सनबर्न फेस्टीव्हला किती डेसिबल पर्यंतची  आवाज मर्यादा ठेवण्याबाबतचा परवाना देण्यात येणार आहे ?
– रात्री १० वाजेपर्यंत स्पीकर  बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत का ?
– सनबर्न  फेस्टिव्हलमध्ये सारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये घातपातासारखा मोठा प्रकार /घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली आहे का ?
– या फेस्टिव्हलमध्ये अनधिकृत मद्य आणि अंमली  पदार्थाची विक्री केली जाते . तरी पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी असून शहरात या कार्यक्रमाला परवानगी देणे योग्य आहे का?
–सनबर्न फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या या पाश्चात्य संस्कृतीमुळे आजची तरुण पिढी नशेच्या विळख्यात सापडून भरकटली  जात आहे असे मत समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
या सर्व कारणांमुळे पुणे शहर दही हंडी आणि गणेशोत्सव समन्वय  समितीने या सनबर्न फेस्टिव्हल ला तीव्र विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळाली तर समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समिती कडून देण्यात आला आहे.  वकील राहुल म्हस्के ,राजेंद्र देशमुख ,गिरीश गुरुनानी ,रामदास थरकुडे ,अजय दराडे ,गणेश काकडे अशा समितीच्या सदस्यांच्या वतीने हे निवेदन हिंजेवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले