Sunburn Tips | उन्हात टॅनिंग आणि सनबर्नपासून मिळवा सुटका, करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sunburn Tips | कडक उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते. सैल होणं, त्वचेवर पुरळ येतात. जर तुमची त्वचा उन्हामुळे भाजली असेल आणि चमक निघून गेली असेल तर यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची (Sunburn Tips) मदत घेऊ शकता. (Home Remedies To Remove Tanning And Sunburn In Summer)

 

विशेषतः या ऋतूत चेहर्‍याची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा इच्छा नसतानाही उन्हात बाहेर जावे लागते. परिणामी, सूर्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्नच्या रूपात पडू लागतो. तथापि काही घरगुती उपचारांच्या मदतीने आपण टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Sunburn Tips)

 

काकडी (Cucumber) –
सनबर्नमध्ये काकडीचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते. काकडीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट घटक (Anti-oxidant Component) टॅनिंग काढून टाकण्यास आणि सनबर्नपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही काकडीचे काप कापून त्वचेवर ठेवू शकता किंवा काकडी किसून सनबर्न झालेल्या त्वचेवर लावू शकता.

 

लिंबू (Lemon) –
लिंबाचा वापर बर्‍याचदा त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी केला जातो. परंतु सूर्यप्रकाशाच्या टॅनिंगसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असतं. आपण दिवसातून एक किंवा दोनदा ते आपल्या चेहर्‍यावर लावू शकतात.

कोरफड जेल (Aloe vera Gel) –
औषधी गुणधर्मांनी भरपूर असलेली कोरफड जेल ही सूर्याच्या हानिकारक किरणांच्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी एक प्रभावी औषध आहे.
कोरफड जेल त्वचेवर लावल्याने सनबर्नमुळे होणारी खाज थांबते.

 

हळद आणि बेसन पॅक (Turmeric And Gram Flour Pack) –
जर तुम्हाला सन टॅनपासून लवकर सुटका करून घ्यायची असेल तर बेसन आणि हळदीचा हा पॅक तुमच्या त्वचेची मृत त्वचा काढून टाकण्याचं काम करेल.
हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत (Turmeric Helps In Relieving Skin Problems) करू शकते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते.
दही थंड अन्नपदार्थ आहे. त्याच्यातील थंडपणामुळे अनेकदा इतर गोष्टींमध्ये दही मिसळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे चेहरा स्वच्छ होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sunburn Tips | try these easy home remedies to remove tanning and sunburn in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Benefits | विना वर्कआऊट आणि डाएटशिवाय वजन होईल कमी, केवळ वापरून पहा ही एक गोष्ट

 

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

 

Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्चर्यकारक 6 फायदे