‘रविवार’ची गोष्ट माहितीये का ? अशी मिळाली आपल्याला १२९ वर्षांपूर्वी रविवारची ‘सुट्टी’

नवी दिल्ली वृत्तसंस्था – सर्व कर्मचारी वर्ग, उद्योगपती, शाळेतील मुलं- मुली, महाविद्यालयातील मुलं-मुली रविवारची आतुरतेने वाट पाहतात. कारण रविवार म्हटलं की, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आरामाचा दिवस, अभ्यासाच्या दिवसांमधून खेळण्याचा दिवस, म्हणून सर्वच रविवारची आतुरतेने वाट पाहतात. पण कोणाला या रविवारची गोष्ट माहित आहे का ? रविवार हा सुट्टीचा दिवस कधी कोणी कसे ठरवले हे माहित आहे का?, तर १२९ वर्षांपूर्वी आपल्याला आपला रविवार मिळाला होता.

एकेकाळी कर्मचारी वर्गाला कामतून कधी सुट्टी मिळत नव्हती. साप्ताहिक सुट्टीचे कुठे नामोनिशान नव्हते. इंग्रजांच्या कपड्याच्या तसंच अनेक कारखाण्यामध्ये भारतीय कामगार काम करत होते. त्यांना आठवड्याच्या सातही दिवस काम करावे लागायचे. त्यांना आठवड्यातून एकही दिवस आरामासाठी मिळत नव्हता. तेव्हा कामगारांसाठी एक दिवस आराम मिळावा म्हणून कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. तेव्हा त्यांनी कामगारांना साप्ताहिक विश्रांती मिळावी यासाठी इंग्रजांकडे प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव इंग्रजांनी फेटाळून लावला.

त्यानंतर लोखंडे यांनी कामगारांसाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले. हे आंदोलन दिर्घ काळ चालले. तब्बल ७ वर्ष हे आंदोलन चालले. त्यानंतर १० जून, १८९० या दिवशी इंग्रजांनी आपला निर्णय बदलून सर्व भारतीयांसाठी रविवार सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर केला. दरम्यान, या निर्णयापूर्वी देशात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच रविवारची सुट्टी दिली जायची. मात्र लोखंडे यांच्या प्रयत्नाने सर्व भारतीयांना आरामासाठी एक दिवस मिळाला.

साप्ताहिक सुट्टी मिळाल्यानंतर लोखंडे तेथेच थांबले नाही तर त्यांनी पुढे येत रोज दुपारी अर्धा तास आरामासाठी असावा यासाठी प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. याच वेळेला आपण आता लंच ब्रेक बोलतो.

आरोग्यविषयक वृत्त –

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम