Jio कडून नववर्षात खास भेट, 98 ते 2020 रूपयांपर्यंतचे ‘हे’ 5 उत्तम प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिओ आपल्या ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून देत आहे. सर्वच कंपन्यांच्या वाढत्या प्रीपेड प्लॅनमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सुरु आहे. त्यातल्या त्यात कमी उत्तम नेटवर्क सुविधा आणि परवडण्याजोगे रिचार्ज प्लॅन असल्याने अनेक ग्राहक जिओला पसंती देत आहेत. त्यामुळे आता जिओने नवीन वर्षाच्या सुरुवातीस  आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. जिओच्या ‘या’ ५ बेस्ट प्लॅनमुळे आपल्याला कमी पैशात जास्त फायदा होतो,  जाणून घेऊया कसा तो.

जीओचा ९८ रुपयांचा प्लॅन : 

जिओचा हा सर्वात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारा प्लॅन आहे. ९८ रुपयांच्या या  रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टू जिओ मोफत कॉलींग सुविधा देण्यात अली आहे. तसेच अन्य नेटवर्क कॉलींगसाठी  तुम्हला १० रुपयांचा टॉप-अप मिळणार आहे. म्हणजे  जर तुम्ही १०८ रुपयांचा रिचार्ज केलात तर तुम्हाला इतर नेटवर्कसाठी १२४ मिनिटं मिळतात.

जिओचा १२९ रुपयांचा प्लॅन : 

१२९ रुपयांच्या या प्लॅनची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला महिन्याभरासाठी २ जीबी ४ जी  डेटा मिळणार आहे. यासोबतच ३०० SMS आणि जिओ ते जिओ फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी १००० मिनिटं महिन्याभरासाठी फ्री मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला  टॉप-अप करण्याची सुविधाही मिळते. इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा कमी वापरणाऱ्यांची हा बेस्ट प्लॅन आहे.

१४९ रुपयांचा प्लॅन : 

या प्लॅनमध्ये दिवसाला १ GB प्रतिदिन डेटा सुविधा मिळणार आहे.  या प्लॅनची वैधता २४ दिवसांसाठी असणार आहे. ज्यात तुम्हाला जिओ- टू -जिओ फ्री कॉलींग सुविधा मिळणार आहे, आणि  जिओ ते इतर नेटवर्कसाठी ३०० मिनिटं फ्री मिळणार आहेत. यासोबत दरदिवसाला १०० SMS ची फ्री सुविधाही मिळणार आहे.

५९९ रुपयांचा प्लॅन : 

८४ दिवसांसाठी जिओकडून ५९९ रुपयांचा  नवा प्लान देण्यात आला आहे. ज्यात प्रत्येक दिवशी २ GB  डेटा मिळणार आहे. या प्लेमध्येही जिओ ते जिओ मोफत कॉलींग सुविधा मिळणार आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी ३००० मिनिटं देण्यात आली आहेत. यासोबत रोज १०० फ्री SMS मिळणार आहेत.

२०२० चा जिओचा वार्षिक प्लॅन : 

जिओ चा हा सगळ्या प्लानपेक्षा सर्वात परवडणारा आणि बेस्ट प्लान आहे. या प्लॅनची व्हॅलि़डिटी वर्षभरासाठी असणार आहे. जिओ ते जिओ अनलिमेटेड कॉल, दरदिवशी १०० SMS सुविधा यात मिळणार आहे. तसेच  १.५ GB डेटा प्रतिदिवशी मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी तुम्हाला १२०० मिनिटं फ्री मिळणार आहेत.

दरम्यान, तुम्ही जर जिओमध्ये पोर्ट करणार असाल किंवा नवीन कनेक्शन घेणार असाल तर ९० रुपये प्राइम मेंबरशिपचे वेगळे भरावे लागतील.  या व्यतिरिक्त इतर प्लानची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही jioच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/