‘इथं’ 3000 महिलांना वाघांनी बनवले विधवा; वाचा कसे शिकार बनताहेत लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना आपण ऐकल्या-वाचल्या असतील. मात्र, देशातील एक भाग असा आहे, तिथं वाघांची शिकार होणे सामान्य बाब आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना येथे सुंदरबन जवळच्या गावात वाघांनी 3000 पेक्षा जास्त महिलांना विधवा बनवले आहे. गावातील महिलांनी सांगितले, की वाघांकडून एकानंतर दुसऱ्या पुरुषाला आपले भक्ष्य बनवले जाते.

बांगलादेश आणि भारतात जंगल आणि पाण्याच्या परिसराजवळ राहणारे लोक मासे पकडून आणि मध एकत्रित करून जीवन जगत असतात. मासे आणि मधाच्या शोधात अनेकदा लोक जंगलाच्या आतमध्ये जातात. अनेकदा वाघ त्यांनाच आपले भक्ष्य बनवतात. Vice न्यूजनुसार, दक्षिणबंगा मतस्यजीबी फोरमचे प्रमुख प्रदीप चॅटर्जी सांगितले, की इथं आत्तापर्यंत 3000 महिलांना वाघाने विधवा बनवले आहे. एखादे घर सोडून दुसऱ्या कोणत्याही घरातील पुरुषावर वाघाने हल्ला केला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून जंगलात जाणाऱ्या लोकांना कठीण परिश्रमानंतर सुमारे 700 रुपये दिवसाला मिळतात. हे लोक प्रतिबंधित परिसरात प्रवेश करतात. त्यानंतर बंगाल टायगर्स त्यांना भक्ष्य बनवतात. इथं वाघांची संख्या मोठी आहे.

दरम्यान, याबाबत गावकऱ्यांनी सांगितले, की गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत कमीत कमी 60 लोक वाघांच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. याचे कारण शहरात मजूरी करणारे लोक गावात परतू लागले आहेत. आता ते मासे पकडण्याचे काम करत आहेत.