Sunetra Ajit Pawar | नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत; सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड

बारामती: Sunetra Ajit Pawar | लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) पराभवानंतर सुनेत्रा पवारांची आज विधानसभेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध झाली.(Sunetra Ajit Pawar)

विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज भरताना यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छूक होते.

मात्र त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली नव्हती, यामुळे भुजबळ नाराज होते. मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो. पण पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. पार्टीत वरिष्ठ निर्णय घेतात. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावे लागेल, असं म्हणज भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती .

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aundh Pune Crime News | पुणे : पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे