५७ वर्षात पहिल्यांदाच ‘हे’ काम करणार सुनील शेट्टी ; सोशल मीडियावर खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अन्ना’ या नावाने नावाजलेल्या सुनील शेट्टीने आपल्या करियरच्या माध्यमातून पुन्हा एकदा धमाकेदार घोषणा केली आहे. अन्ना साउथ इंडियन चित्रपटांमध्ये मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे. सोनू सूद, विवेक ओबेरॉय अशा अभिनेत्यानंतर अन्ना एक मोठा हिंदी सिनेमामधील अभिनेता आहे. जो आता दक्षिण भारतीय चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्यास तयार आहे. सुनील शेट्टीने त्याच्या मनातील गोष्टी मीडियासमोर मांडल्या आहेत. आणि पूर्वी झालेल्या चुकांची जबाबदारी घेतली. या विचारानंतर सुनील पुन्हा एकदा त्याच्या शॉर्टबॅकसाठी तयार झाला आहे.

‘इन्डियाज असली चैंपियन’ नावाच्या रिऍलिटी शो होस्ट करणार अशी चर्चा चालू असतांना सुनील शेट्टीने पुन्हा एक मोठा खुलासा केला. त्याने त्याच्या पुढील चित्रपटाचे पोस्टर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे एक कन्नड चित्रपटाचे पोस्टर आहे ज्यात सुनील शेट्टी कन्नड चित्रपटांत पदार्पण करणार आहेत. या पोस्टरमध्ये त्याने पांढरी धोती कुर्ता घातला आहे. हा पोस्टर शेयर करत त्याने लिहिले की नमस्कार मी माझा पहिला कन्नड चित्रपट पैलवान चा पहिला पोस्टर शेयर करतो आहे, मी या चित्रपट सुदीप आणि दिग्दर्शक एस कृष्ण यांच्याबरोबर काम केले आहे. या दोघांसोबत मी पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि सिनेमाचा पहिला कट पाहिल्यावरच पोस्टर सोडण्यात आले आहे. चित्रपट ‘पैलवान’ मध्ये सुनील खलनायकाची भूमिका करतांना दिसून येणार त्याचे नाव सरकार असे आहे.